'महापरिनिर्वाण दिना' निमित्त खामगाव शहरात 'भव्य कॅन्डल मार्च':माजी आ दिलीपकुमार सानंदा यांनी केले अभिवादन
खामगांव : जनोपचार :- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'महापरिनिर्वाण दिना' निमित्त खामगाव शहरातुन 'भव्य कॅन्डल मार्च' काढण्यात आली . या कॅन्डल मार्चमध्ये शहरातील समता किडा मंडळ शंकर नगर, अशोक किडा मंडळ बाळापूर फैल, अशोक किडा मंडळ दाळफैल, सम्राट
किडा मंडळ आंबेडकर नगर हरिफैल, रमाबाई महिला मंडळ शंकर नगर, दाळफैल व बाळापुर फैल येथील बौध्द उपासक-उपासिका हजारोंच्या
संख्येने उपस्थित होते. प्रमुख मार्गाने फिरुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ कॅन्डल मार्चचा समारोप झाला. त्या ठिकाणी सामुहिक त्रिशरण पठण
करण्यात आले. या वेळी माजी आ दिलीपकुमार सानंदा यांनी महामानवाला अभिवादन केले
إرسال تعليق