*बाळापुर फैल येथे काकडा आरती सांगता निमित्य विविध अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न*
खामगांव(जनोपचार)-बाळापुर फैल येथील हनुमान,विठ्ठल रुख्मिणी मंदिर येथून गुरुदेव जिजामाता भजनी मंडळाच्या वतीने माळी पौर्णिमे पासुन ते कार्तिक पौर्णिमे पर्यंत दररोज पहाटे गजानन महाराज मंदिर,शेरावली माता मंदीर,तसेच परिसरातील मंदिरात पहाटे पुजन केले जाते.हातात आरतीचे ताट आणि पाण्याचा कलश घेऊन टाळ मृदूंगाच्या गजरात संतांचे अभंग म्हणत धर्म पताका खांद्यावर घेऊन काकडा आरती दिंडी अखंड महिना भर निघाली...
तसेच काकडा उत्सव सांगता निमित्य आज दि ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ह. भ.प. रामकृष्ण महाराज वराडे यांचे प्रवचन झाले नंतर पताकासह टाळ मृदुगाच्या गजरात परिसरातील मुख्य मर्गाने भव्य पालखी सोहळा दिंडी काढण्यात आली होती दिंडीचे ठीक ठिकाणी स्वागत करण्यात आले परिसरात नवचैतन्य भक्ती चे वातावरण निर्माण झाले होते .
त्यावेळेस श्रीकृष्ण फुटवाईक, भगवान डोके,ज्ञानेश्वर पाटील, दिलीप वाघ, रामरावजी देशमुख, किशोर बुट्टे, संभाजी शिंदे, विठ्ठल मिसाळ,विलास पवार, श्रीकृष्ण बेलुरकर,कैलास पवार,सचिन शेळके, राजू बेलूरकर, रामकृष्ण बुट्टे,बाबाराव घुगे,संतोष गायकवाड, अंश पवार,प्रविण गायकवाड,जय पवार, हरी पवार, संतोष पवार, रवी पवार,पवन चव्हाण,यांच्यासह नागरिकांनी महिनाभर परिश्रम घेतले दिंडीत लहान मुलं व महिलांची संख्या लक्षनीय होती
إرسال تعليق