कु युक्ता ची रिसर्च सेंटर ला निवड

 कु. युक्ता सरोदे हिची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशनल रिसर्च सेंटर तिरुपती येथे निवड



खामगाव- (जनोपचार)शहरातील नामांकित आर्किटेक्ट टिफिन कुमार सरोदे यांची कन्या कु. युक्ता सरोदेची बुलढाणा जिल्ह्यातून देशातील प्रथम क्रमांकाच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशनल रिसर्च सेंटर तिरुपती येथे निवड झाली आहे. कु. युक्ता सरोदे हिचे हायर सेकंडरीचे शिक्षण रावेर येथे पूर्ण झाल्या असून आता पुढील सायन्स विषयाचे आधुनिक शिक्षण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशनल रिसर्च सेंटर तिरुपती येथे घेणार आहे. तिरुपती आयआयटी संस्था ही भारतातील पहिल्या क्रमांकाची संस्था असून कु. युक्ता सरोदेची बुलढाणा जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे. ती तिच्या यशाचे श्रेय वडील आर्किटेक्ट दिपिन कुमार सरोदे व आई मोना सरोदे यांना देते. तिच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे तिचा सर्वत्र कौतुक केला जात आहे.

Post a Comment

أحدث أقدم