आजचे बालक उद्याच्या बलशाली भारताचे शिल्पकार - के. आर. राजपूत
आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कुलमध्ये बालकदिन उत्साहात साजरा
खामगाव (जनोपचार):- आजचे बालक हे उद्याच्या बलशाली भारताचे शिल्पकार आहेत, त्यामुळे शिक्षकांनी त्यांना योग्य पध्दतीने घडवावे, असे मत आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष के. आर. राजपूत यांनी मांडले.
खामगाव शहरातील घाटपुरी नाका परिसरातील आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कुलमध्ये १४ नोव्हेंबर रोजी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती अर्थात बालक दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषण करताना संस्थाध्यक्ष के. आर. राजपूत बोलत होते. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव जितेंद्रजी चौहान, सदस्य कविश्वरजी राजपूत, संगीता चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पुजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात विराज राजपूत या बालकाला गुलाबपुष्प देवून बालकदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक विद्यार्थ्यांनी बालकदिनावर आधारीत भाषणे दिली. बालकदिनानिमित्त विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा जास्त ताण न देता दिवसभरातील बराच वेळ त्यांना खेळण्यासाठी देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन वैशाली पातुरकर यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्या अनिता पळसकर यांनी तर आभार प्रदर्शन दामिनी चोपडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षिका प्रियंका राजपूत, शिक्षिका ज्योती वैराळे, अश्विनी ठाकरे, ममता महाजन, माधुरी उगले, सुषमा बाहकर, अलका वेरूळकर, प्रीया देशमुख, विजया पोकळे, लिपिक कोमल अकनकर, मदतनीस सुवर्णा वडोदे, स्वाती बोके, राजकन्या वडोदे, सपना हजारे, वंदना गावंडे यांनी परिश्रम घेतले.
إرسال تعليق