अभिनेते सुनिल शेंडे यांचे निधन
वृत्तसंस्था - मराठी - हिंदी मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ
अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले आहे. वयाच्या
७५ व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
आहे. सरफरोश', गांधी', वास्तव' अशा अनेक सिनेमांत
ते महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्यांच्या या भूमिका
प्रेक्षकांमध्ये चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या. सुनील शेंडे राहत्या घरी चक्कर येऊन पडले. त्यानंतर त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. विलेपार्ले येथील राहत्या घरीच रात्री एक वाजता त्यांचे निधन झाले आहे. आज सुनील शेंडे यांच्या पार्थिवावर पारशीवाडा याठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमित
अंत्यसंस्कार करण्यात आले.
إرسال تعليق