बेताल बोलणार्या कोश्यारीचा राजिनामा घ्या -देवेद्र देशमुख..
उपविभागीय कार्यालय छत्रपतींचा दुग्ध अभिषेक
खामगाव..जनोपचार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवद्रोही असून छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे राष्ट्रपुरुष आहेत.कायद्यानुसार राष्ट्रपुरुषांची बदनामी अथवा त्यांच्याविषयीचा चुकीच बोलून ते पसरवण्याचे कृत्य गुन्हा ठरतो त्यामुळे अश्या व्यक्तीला महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदी राहण्याचा अधिकार नाही अश्या बेताल वक्तव्य करणार्याचा राजिनामा ध्यावा अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खामगाव च्या वतिने ऊपविभागीय अधिकारी कार्यालयात महामहीम राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांना निवेदन देऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा दुग्ध अभिषेक करून जय जयकार केला व भगतसिंह कोष्यारी यांच्या विरोधात त्रिव निदर्शने करण्यात आली आणि भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रातून हद्द पार करा अशी मागणी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापाठीच्या पदवी प्रदान कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे आता जुने झाले, आजच्या काळातील आदर्श घ्यायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. राज्याचे राज्यपाल हे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान करत आहे.अपमान जनक बोलणं संदर्भहीन बोलणं, वादग्रस्त बोलणं, हे राज्यपाल कोशारी यांचे एकूण व्यक्तिमत्व दिसते, यापूर्वी देखील राज्यपाल यांनी असंच अपमान जनक वक्तव्य केलेले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज हे भविष्यकाळ, वर्तमान काळ, भूतकाळ, या तिन्ही काळाला प्रेरणा देणार असे व्यक्तिमत्त्व आहे. ते कधीही कालबाह्य होणारे व्यक्तिमत्त्व नाही. एक वेळेस कोश्यारी काळ कालबाह्य होतील. इतिहास जमा होतील. शिवाजी महाराज कधीही कालबाह्य होणार नाहीत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्यांच्या वर कायद्यानुसार राष्ट्रपुरुषांची बदनामी अथवा त्यांच्याविषयीचा चुकीचा इतिहास पसरवण्याचे कृत्य केल्यामुळे त्यांचा राजिनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष देवेद्र देशमुख यांनी केली.
या वेळी अंबादास पाटिल,महेद्र पाठक,विकास चव्हाण,देविदास गोतमारे,विश्वनाथ झाडोकार,आकाश खरपाडे,रमाकांन्त गलांडे, अजय धानोकर, अजिज खान,
राजेद्र वराडे,दिलीप पाटिल,संजय गवई,जगन्नाथ देवकर,संतोष वाधमारे,ओम शेटे, सैय्यद मोइऊद्दीन, प्रशांत घोटे,नितेश खरात,मिर्जा अक्रम बेग,तालिफ शेख,नवल वानखडे,जयराम माळशिकरे,बंडु कनकवार,अजिम खान नसिमखान आदी ऊपस्थित होते
إرسال تعليق