" अमृत भारत रथ" यात्रेचे स्वागत

 परशुराम कुंड आमंत्रण यात्रा " अमृत भारत रथ" यात्रेचे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांच्याकडून स्वागत.



लोहित अरुणाचल प्रदेश येथील भगवान परशुरामाच्या मंदीरास सर्वांनी अवश्य़ भेट द्या-आ.ॲड.आकाश फुंडकर

खामगाव(जनोपचार)- भगवान परशुरामांच्या भव्य मंदिराचे भूमिपूजन नुकतेच देशाचे गृह व सहकार मंत्री मा.ना.श्री. अमितजी शहाजी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.  या मंदिरात भगवान परशुरामांच्या पंचधातूच्या 51 फूट उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. याच्या प्रचार, प्रसार व आमंत्रण देण्याकरिता आयोजित परशुराम कुंड आमंत्रण यात्रा " अमृत भारत रथ" चे आगमन आज खामगाव नगरीत झाले.  यावेळी सर्वांनी लवकरच पुर्णत्वास येणाऱ्या भगवान परशुरामांच्या या भव्य़ मंदीरास अवश्य़ भेट द्यावी व भगवान परशुरामांचे आशिर्वाद घ्यावे असे आवाहन आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केले.

लोहित नदी अरुणाचल प्रदेश येथील भगवान परशुराम कुंड येथे 51 फुट उंचीच्या भगवान परशुरामांच्या मुर्तीची पंचधातुच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. याच्या प्रचार, प्रसार व आमंत्रण देण्याकरिता आयोजित परशुराम कुंड आमंत्रण यात्रा " अमृत भारत रथ" चे आगमन आज खामगाव नगरीत आगमन झाले. सदरची यात्रा परशुराम कुंड चेन्ऩई ते जयपूर जाणार आहे. या यात्रेसोबत संत स्वामी श्री रामनारायणदासजी माधवजी शर्मा यांचे स्वागत आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केले. तसेच यावेळी आमदार ॲड आकाशजी फुंडकर यांचे स्वागत शैलेशजी शर्मा व श्री दामोदरजी पांडे यांनी केले.

सदरची यात्रा खामगांव नगरीतील स्थानिक महाराष्ट्र ब्राह्मण सभा मंगल कार्यालय येथे आली असता आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी भगवान परशुरामजींचे दर्शन घेतले व या यात्रेत सहभागी सर्व महंत, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमात शहरातील गणमान्य नागरिक व सर्व भाषिय, शाखीय,प्रांतीय ब्राह्मण समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم