• शेगाव, (जनोपचार)
वारकरी संप्रदायाचे पायिक
असलेले ज्ञानेश्वर पाटील उपाख्य
नानांचा जन्मदिवस व वाढदिवस
अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.
त्यांनी केलेल्या एका छोट्या
आवाहनाने गरजवंतांना मिळाला
मोठा दिलासा, असे प्रतिपादन शैलेंद्र पाटील यांनी ज्ञानेश्वर पाटील यांच्या वाढदिवस
सोहळ्याप्रसंगी केले.
अभीष्टचिंतन बुधवार १२ ऑक्टोबर रोजी उपस्थित
काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी
ज्ञानेश्वर पाटील यांचा वाढदिवस
अभीष्टचिंतन सोहळा माऊली
स्पोर्टस्च्या भव्य प्रांगणात संपन्न
झाला. यावेळी जिल्ह्यातील सर्वच नेते,
पदाधिकारी, कार्यकर्ते
होते. पुढे बोलताना शैलेंद्र पाटील
म्हणाले की, नानांच्या चाहत्यांनी
शैक्षणिक साहित्य, आरोग्य साहित्य
प्रचंड प्रमाणात भेट म्हणून दिले,
रक्तदान केले. त्यामुळे गरजू विद्यार्थी शैक्षणिक साहित्य व गोरगरीब जनतेस आरोग्य साहित्य मोठ्या प्रमाणात वितरीत करणे शक्य होणारआहे.
إرسال تعليق