खामगाव लोकनितिकार पुरस्कारांचे आयोजन
राष्ट्रीय लोकनिति विचार मंचाचा उपक्रमखामगाव लोकनितीकार पुरस्कार स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
खामगाव, (का. प्र.) : राष्ट्रीय लोकनिति विचार मंच च्या माध्यमातून लोकनितिकारांचे अधिवेशन फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथे पार पडले. मंच च्या विविध स्थानिक शाखा तयार करून जनसामान्यांतून लोकनितिकार घडविण्याचा मानस अधिवेशनात करण्यात आला. राष्ट्रीय लोकनिति विचार मंच च्या दिल्ली अधिवेशनातील चर्चा सत्रात ज.छ.सि रविकांत वावगे, डी एन चौहान, सुश्री अलका श्रीवास्तव, कविनंद कुमार, जीवकांत झा, डॉ अपर्णा जी, अॅड. आशिश प्रकाश, अॅड अजय अमृतराज व डॉ लोचन शर्मा उपस्थित होते. या अनुषंगाने राष्ट्रीय लोकनिति विचार मंचाची स्थानिक शाखा खामगाव येथे स्थापन करण्यात आली. स्थानिक लोकनितिकारांना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी तसेच जनतेतील विचारवंतांना पुढे आणण्यासाठी शोध खामगाव च्या लोकनितिकारांचा हा उपक्रम खामगांवात सुरू करण्यात येत आहे.
संविधानाने भारतीयांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपले विचार , संकल्पना व्यक्त करण्याची संधी प्राप्त झाली पाहिजे. यातूनच समग्र विचाराअंती गांव शहरांच्या विकासासाठी आवश्यक लोकनिति ठरली पाहिजे. लोक सहभागातून निर्माण होणारी सर्व समावेशक लोकनीति हाच लोकशाहीचा खरा आत्मा आहे. म्हणून राष्ट्रीय लोकनिति विचार मंच च्या वतीने लोकांचे विचार व्यक्त करण्यासाठी व त्यातून खामगावकरांच्या कल्पनेतील शहर विकासाला आकार देण्यासाठी शोध खामगावच्या नितीकारांचा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खामगाव शहराच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने आपले विचार व्यक्त करण्यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये कोणालाही सहभागी होता येणार आहे. जास्तीत जास्त सुज्ञ नागरिकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सदर मंच व स्पर्धेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबध नाही केवळ खामगाव शहराचा शाश्वत विकास व्हावा हे ध्येय समोर ठेवून शहरातील नागरिकांना यामध्ये सहभागी करुन घेण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे असे मंचाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये शहराचा विकास आराखडा कसा असावा व विकास कशा पध्दतीने करावा याबाबतचे विचार निःसंकोचपणे व्यक्त करु शकता येणार आहेत. सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय लोकनिती विचार मंच च्या खामगाव शाखेच्या फेसबुक पेज च्या https://www.facebook.com/ khamgaon.lokneeti लिंकवर जाऊन जॉईन व्हावे व त्या फेसबुक पेज वरून संदेश पाठवून नांव नोंदणी करायची आहे. सहभागी होणारांच्या मुलाखती व विचारांना प्रकाशित केले जाईल व त्यांना सहभागी झाल्या बद्दल मानपत्र आणि स्मृतिचिन्ह पुरस्कार देण्यात येईल असे कळविण्यात आले आहे..
संविधानाने भारतीयांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपले विचार , संकल्पना व्यक्त करण्याची संधी प्राप्त झाली पाहिजे. यातूनच समग्र विचाराअंती गांव शहरांच्या विकासासाठी आवश्यक लोकनिति ठरली पाहिजे. लोक सहभागातून निर्माण होणारी सर्व समावेशक लोकनीति हाच लोकशाहीचा खरा आत्मा आहे. म्हणून राष्ट्रीय लोकनिति विचार मंच च्या वतीने लोकांचे विचार व्यक्त करण्यासाठी व त्यातून खामगावकरांच्या कल्पनेतील शहर विकासाला आकार देण्यासाठी शोध खामगावच्या नितीकारांचा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खामगाव शहराच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने आपले विचार व्यक्त करण्यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये कोणालाही सहभागी होता येणार आहे. जास्तीत जास्त सुज्ञ नागरिकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सदर मंच व स्पर्धेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबध नाही केवळ खामगाव शहराचा शाश्वत विकास व्हावा हे ध्येय समोर ठेवून शहरातील नागरिकांना यामध्ये सहभागी करुन घेण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे असे मंचाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये शहराचा विकास आराखडा कसा असावा व विकास कशा पध्दतीने करावा याबाबतचे विचार निःसंकोचपणे व्यक्त करु शकता येणार आहेत. सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय लोकनिती विचार मंच च्या खामगाव शाखेच्या फेसबुक पेज च्या https://www.facebook.com/
إرسال تعليق