जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क -8208819438
मोझरी(जनोपचार)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५४ व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त स्व.उद्धवराव गाडेकर महाराज स्व.किसनरावजी पारिसे महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य श्रीगुरूदेव अध्यात्म गुरूकुल द्वारा आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले शिबिराचे उद्घघाटन शिवदास गाडेकर रवी मानव अमर वानखडे नरेंद्र जीवतोडे शुभम शेवाने यांच्या हस्ते झाले या शिबिराला राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज विधानसभा सदस्य यशोमतीताई ठाकूर आदर्श गाव राजगड सरपंच चंदूपाटील मारकवार टिकेकर वाडीचे सरपंच संतोष टिकेकर यांनी भेट दिली शिबिराच्या यशस्वीतेसाठी विकास बोरवार प्रशांत सुरोषे साक्षी पवार जान्हवी राऊत अनुप देशमुख पंकज पांडे मुकेश कोल्हे रजनीकांतन अतकरी पवन खरासे रोषण ठाकरे सुयोग राजनेकर नंदनी कडू राखी वानखडे यांनी सहकार्य केले
إرسال تعليق