बोथा घाटात बस-दुचाकी अपघात 2 ठार

ब्रेकिंग...


बोथा घाटात बस-दुचाकी अपघात 2 ठार



खामगाव:- जनोपचार ::--बोथा घाटात

एस.टी. महामंडळाच्या बसने दुचाकीला जबर

धडक दिली. या धडकेत 1 जण जागीच ठार तर

दुसऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सदर

अपघात आज 16 ऑक्टोबरच्या दुपारी 2 वाजेच्या

दरम्यान घडला. अपघातामध्ये गजानन शेळके

यांचा घटनास्थळीच तर प्रकाश जाधव यांचा

उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शेळके हे

जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे

कक्षसेवक म्हणून कार्यरत आहेत. ते आज रविवार

16 ऑक्टोबर रोजी काही कामानिमित्त दुपारी

दुचाकीने आपला मित्र प्रकाश तोताराम जाधव

कोलवड यांच्यासोबत शेगावकडे चालले होते,

दरम्यान त्यांना दुपारी अज्ञात एसटी बसने देव्हारी

फाट्याजवळ जबर धडक दिली. या धडकेत

गजानन शेळके हे जागीच ठार झाले तर त्यांच्या

दुचाकीवर असलेल्या प्रकाश जाधव यांचा उपचारा

दरम्यान मृत्यू झाला आहे. गजानन शेळके हे

मनमिळावून स्वभावाचे होते, ते नेहमी जिल्हा

रुग्णालयात आलेल्यांना नेहमी मदतीसाठी धावून

जायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगी असा

आप्त परिवार आहे. त्यांचे बंधू विष्णू शळके

मिलींद नगरात राहतात तर गजानन शेळके हे

जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय क्वार्टर म

राहत होते.

जॉइंट

Post a Comment

أحدث أقدم