वाचवा हो वाचवा जि प शाळेला वाचवा!!

गणेशपुर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मागत आहेत टीसी

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : - एकीकडे राज्य सरकार शिक्षणावर भर देत आहे तर दुसरीकडे मराठी शाळांमधील शिक्षकांच्या भरतीसाठी दुर्लक्ष करीत आहे त्यातूनच शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गळती सुरू असल्यामुळे आता पुन्हा मराठी शाळा सुरू ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे

प्रासंगिक छायाचित्र

तालुक्यातील गणेशपुर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर पाच-सहा शिक्षक कमी असल्यामुळे आता विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक नाव शाळेतून काढण्याकडे वळत आहेत परिणामी शाळा बंद होऊ शकते त्यामुळे जिल्हा परिषदेच्या गणेशपुर येथील मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी बुलढाणा यांना तसे पत्र देऊन सुचितही केले या पत्रात नमूद आहे की उपरोक्त विषयांन्वये सादर की जिल्हा परिषद हायस्कुल, गणेशपूर येथिल कार्यरत शिक्षक अशोक मादनकर हे नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झालेले आहेत. ते कार्यरत असतानाच 4 पदे रिक्त होती, त्याल अजुन भर पडुन आता 5 परे रिक्त झालेली आहे. त्यामुळे गावातील लोक आपल्या मुला/मुलीच्या (TC) मागत आहे, सदर (१८) मागण्याचे प्रमाण वाढत आहे तरी शिक्षकांचे परे तात्काळ भरल्यास (1C) नेण्याच्या प्रकरणात घट होवु शकते.



Post a Comment

أحدث أقدم