हिंदू-मुस्‍लिम मुद्यावरुन दिशाभूल करण्याचा प्रयत्‍न : आ.धिरज लिंगाडे

 लाखनवाडा येथे  ईद मिलन व जातीय सलोखा कार्यक्रम 

खामगाव ः जनोपचार न्यूज नेटवर्क :लाखनवाडा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा  लाखनवाडा येथे जातीय सलोखा व ईद मिलन कार्यक्रमाचे  असे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये गावातील तसेच पंचक्रोशीतील सर्व धर्मांचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रामुख्याने पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरजजी लिंगाडे तसेच पश्चिम अकोला मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण साहेब, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश तायडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक शिवाजीराव उर्फ रावसाहेब पाटील, त्याचप्रमाणे काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वरदादा उर्फ नाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडी अजितदादा गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष शेख सलीम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्रजी गायकी, काँग्रेसचे नाशिक विभागाचे निरीक्षक अजय जी तायडे, सेवादल जिल्हाअध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे ओबीसी अमरावती विभागीय निरीक्षक संजय बगाडे, समाजसेवक प्रकाश टीकार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा संघटक संभाजीराव टाले हे उपस्थित होते. 

     सर्वप्रथम उपस्थित सर्व समाज बांधवांना आयोजकांकडून गुढीपाडव्याच्या तसेच ईदच्या येणाऱ्या रामनवमी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

    या कार्यक्रम प्रसंगी बोलताना संभाजीराव टाले यांनी सांगितले की, प्रत्येक धर्म हा मानवता शिकवतो  लोक धर्माच्या नावावर लढायला तयार आहे. पण धर्माचे आचरण करायला कोणी तयार नाही. त्यामुळे आपण धर्माचं आचरण करावे. चांगल्यातून चांगलं होत असते. प्रत्येक धर्माची शिकवणूक ही चांगलीच आहे. काँग्रेस नेता ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी बोलताना सांगितले की, असे कार्यक्रम होणे ही काळाची गरज असून यातून धर्म धर्मामध्ये एकोपा निर्माण होतो.  कोणताच धर्म वाईट नाही. वाईट ही प्रवृत्ती असते. 

लाखनवाडा हे गाव हिंदू मुस्लिम बांधव गोडी गुलाबी ने नांदणारे एक आदर्श गाव आहे असे गौरव उद्गार आ. साजिद खान पठाण यांनी यावेळी काढले. मला हिंदू बांधवांनी खूप प्रेम दिले तर आ. धीरजी लिंगाडे यांनीहिंदू मुस्लिम यांच्या मुद्दा घेऊन जातीय तेढ निर्माण करणे जनतेची दिशाभूल करण्याचे काम काही लोक करत आहे असे सूचक विधान यावेळी केले. यावेळी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश तायडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी यांनी सुद्धा  मौलिक असे मार्गदर्शन केले. यावेळी आयोजकांच्या कडून फराळ व शीरखुर्मा चे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांची हिंदू मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सावळे यांनी केले. मुस्लिम पंच कमिटी अध्यक्ष सोफयान उल्ला खान, उपाध्यक्ष शाफील्लाखान जहीर खान, रोकन्नोदीन जमदार, कौसर खान, आबिद खान, शेख सलीम, इदरीस खान, जका उल्ला खान, साजिद जमदार, नौशाद खान, शेख साबिर, मो शकिल, इर्शाद खान, जव्वाद उल्ला खान, फुरकान अहेमद, अज़र खान, सिबगत उल्ला खान, सदाकत खान, मो सैफान, मो तहेसीन, मो कासीम, अशारिब शेख आसिफ शेख रेहान खान, मो अनिस ब्बलु भाई, सदाशिव राऊत, रामेश्वर बंड, भास्कर वाकोडे, मनोहर सरदार, पांडुरंग राऊत, रामदास महाराज, श्याम गुरुजी, अमोल पिपळकर, राहुल पांढरे,  नारायण पांढरे,  विजय खंडारे,  बंडू वानखडे,  गजानन उकर्डे, संतराम तायडे,  विलास पांढरे,  डॉ.राठी  रामेश्वर सर,  डॉ जाधव, प्रकाश वानखडे,  कैलास वाकोडे,  सतीश वानखडे, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुभाष सावळे यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم