खामगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचा बड्या पदाधिकाऱ्याचा रामटेक पोलिसांनी घेतला खामगावात शोध !; खामगाव जिल्ह्यात खळबळ !!
खामगाव जनोपचार विशेष प्रतिनिधी :- शेतकऱ्यांची फसवणूक तसेच आनंद खंते वय ४५ याचे आत्महत्येस कारणीभूत प्रकरणी रामटेक पोलिसांनी राष्ट्रवादीच्य खामगाव तालुक्यातील एका बड्या पदाधिकाऱ्याविरुद्ध रामटेक पोलिसात गुन्हा दाखल आहे.
त्यांच्या शोधासाठी १० एप्रिल रोजी रामटेक पोलीस खामगावात आले होते. पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी जावून शोध घेवून तसेच गवंडाळा येथेही एका फॉर्महाऊसवर त्यांचा शोध घेण्यात आल्याचे समजते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसही यांचा शोध घेत होते. परंतु उशिरापर्यंत ते पोलिसांना मिळून आले नाहीत.
सबसीडीच्या बेसवर शेडनेट देतो म्हणून पैसे घेवून फसवणूक केली तर मृतक आनंद खते यांनाही शेतकऱ्यांकडून स्वतःसाठी पैसे घ्यायला लावले. नंतर टाळाटाळ करणे सुरु केले तर आनंद खंते यांना शेतकऱ्यांचा त्रास सहन न झाल्याने हताश होवून चेरी फॉर्म रामटेक येथे आत्महत्या केली. ही फसवणूक सुमारे २५ लाखाने केल्याचे कळते. याबाबत रामटेक पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३ (५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
إرسال تعليق