अभाविप खामगांव तर्फे आयोजित व्यक्तिमत्त्व विकास शिबीर दिशा २०२५ संपन्

खामगांव - जनोपचार न्यूज नेटवर्क : स्थानिक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा खामगांव च्या वतीने आयोजित व्यक्तिमत्त्व विकास शिबीर दिशा २०२५ टिळक स्मारक मंदिर येथे संपन्न झाले.शिबिराच्या उद्घाटनासाठी रा.स्व.से चे तालुका संघचालक संतोष देशमुख, माजी जिल्हा संघचालक तथा खामगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव महादेवराव भोजने, टिळक स्मारक महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ विद्याताई कावडकर, शाखा अध्यक्ष प्रा चंद्रकांत मेंडोले, नगर मंत्री गणेश कठाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.



शिबिरात दिनांक ७ एप्रिल ला महिला सक्षमीकरण डॉ विद्याताई कावडकर, ध्येय निश्चितती महादेवराव भोजने, व्यक्तिमत्त्व विकास संकल्पना विनोद डीडवाणीया,१०वी१२वी नंतर काय?व स्पर्धा परीक्षा डॉ अशोक पडघान तर दिनांक ८ एप्रिल ला एआय कृत्रिम बुद्धिमत्ता विशाल मसने, सरकारी योजनातील शिष्यवृत्ती जिग्नेश कमानी आदींनी शिबिरात मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना पोलिस स्टेशन व बॅकेचे कामकाज माहीत व्हावे याकरिता पोलिस स्टेशन ला क्षेत्रभेट देण्यात आली येथिल पीआय सारिका नारखेडे व पो.कॉ.नितिन पाटील यांनी संपुर्ण पोलिस स्टेशन चे कामकाज समजून सांगितले व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.तसेच खामगांव अर्बन बँकेला भेट देऊन तेथील संपुर्ण बॅंकेचे कामकाज मुख्यशाखाधिकारी जयंत कुळकर्णी यांनी दिली या दोन्ही भेटीत पुर्व कार्यकर्ता रामेश्वरजी घोराळे उपस्थित होते त्यांनी सुध्दा प्रत्यक्ष कामकाज व अनुभावातुन विद्यार्थ्यांना शिकायला मिळाले अशा भेटी च्या आयोजना बद्दल अभाविप च्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

शिबिराच्या समोरोहास जिल्हा प्रमुख गणेश घोराळे,जिल्हा संयोजक ऋषिकेश वाघमारे,जिल्हा संगठनमंत्री महेश वाघमारे, शाखा उपाध्यक्ष अस्मिता भोजने,शिबिर संयोजक शुभम राठोड, नगर सहमंत्री वैष्णवी जवळकार उपस्थित होते.जिल्हा प्रमुख गणेश घोराळे यांनी अभाविप च्या दोन दिवसीय  शिबिरातुन विद्यार्थ्यांना निश्चित च दिशा मिळाली असेल अशी अपेक्षा व्यक्त केली.जिल्हासंयोजक ऋषिकेश वाघमारे यांनी अभाविप विषयी विचार व्यक्त केले. जिल्हा संगठनमंत्री महेश वाघमारे यांनी अभाविपतुन समाजाभिमुख, सृजनशील व्यक्ति घडतो असे मत व्यक्त केले.अभाविप शाखा उपाध्यक्ष अस्मिता भोजने यांनी कार्यकर्त्यांनी उन्हातान्हात मेहनत घेऊन हे शिबीर यशस्वी केले त्या बद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक केले.सदर समारोहाचे संचालन अभिषेक देशमुख,प्रास्ताविक सहमंत्री वैष्णवी जवळकार तर आभार शिबीर संयोजक शुभम राठोड यांनी मानले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी संयोजक शुभम राठोड,नगरमंत्री गणेश कठाळे,सहमंत्री वैष्णवी जवळकार,सानिका राठोड,साक्षी करवते,आनंद निकाळजे,सुयोग चंद्रे,अभिषेक देशमुख,कार्तिक नेमाने,जागृती नेमाने,दीप कांबळे, पंकज भोपळे,सविता अंभोरे, वैष्णवी मानकर,वैष्णवी पराये आदित्य वतपाल, ऋषिकेश मुरेकर,ओम काळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم