भीम जयंती निमित्त खामगाव शहरातील सर्व क्रीडा मंडळाची संयुक्त
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: - अवघ्या काही दिवसांत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या थाटा माठात साजरी करण्याचा निर्णय खामगाव येथील मंडळांनी घेतला आहे.. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून ते मुख्य मार्गाने मिरवणूक निघत असते सर्व क्रीडा मंडळे या मध्ये सहभाग घेऊन आपला देखावा,आखाडा, सादर करीत असतात या दरवर्षी प्रमाणे जयंती या वर्षी सुद्धा शिस्तीत,शांतते मध्ये आणि सुसंस्कृत पणे निघणार असून कुठल्याही प्रकारचे वाद विवाद न होता एकजूट होऊन महामानवाची जयंती निघाली पाहिजे आपल्या मुळे खामगाव शहराचे व समाजाचे नाव राखल्या गेले पाहिजे या अनुषंगाने आज पत्रकार भवन येथे शहरातील सर्व क्रीडा मंडळाची संयुक्त बैठक संपन्न झाली,या दरम्यान आपापसातील वाद विवाद न व्हावा भाऊ बांधिलकीने जोडून एक मेकांना सहकार्य करावे व काही अडचणी असतील तर एकजूट होऊन त्या अडचणी वर मात करण्यात यावी अशी चर्चा करण्यात आली.या बैठकी मध्ये अशोक क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ दाळ फैल, अशोक क्रीडा मंडळ बाळापूर फैल,पंचशील क्रीडा मंडळ बाळापूर फैल,भीमशक्ती नवयुवक मंडळ बाळापूर फैल(खदान),समता क्रीडा मंडळ शंकर नगर,सम्राट क्रीडा मंडळ हरी फैल,सिद्धार्थ क्रीडा मंडळ शिवाजी नगर(जुना फैल),तथागत बौद्धेशीय क्रीडा मंडळ हिरा नगर, व शहराला लागून असलेले ग्रामीण मंडळ घाटपुरी, जणूना, सुटाळा, वाडी,येथील या सर्व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
إرسال تعليق