खामगाव पोलिसांची कामगिरी म्हणजे "ना काहु से दोस्ती, ना काहु से बैर" 

पोलीसाची पाटी लावून बेसिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनाला ठोकला दंड 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: -बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील पोलिसांची कामगिरी नेहमीच चर्चेत राहिली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अनेकांना जेरबंद केले आहे एवढेच नव्हे तर वाहतुकीला देखील सुरळीत करण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्टा करणारी पोलीस खामगावत आहेत. आज संध्याकाळी खामगाव च्या मुख्य रस्त्यावर असलेल्या घवाळकर देशासमोर नियमांची पायमल्ली करत असलेली एक पांढरा रंगाची कार पोलिसांना दिसली. या वाहनाच्या समोरील बाजूस पोलीस असे लिहिलेले होते. नो पार्किंग मध्ये व रॉंग साईड असलेल्या वाहनामुळे सुमारे एक तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. तेवढ्यात कर्तव्य तत्पर असलेले ट्राफिक त्या ठिकाणी दाखल झाले व पोलिसांनी या गाडीला ऑनलाइन चलन ठोकला. यावेळी अनेकांनी पोलिसांचे कौतुक केले.

Post a Comment

أحدث أقدم