..........जाहिरात.........

चिंचपूर ग्रामपंचायत सरपंचपदी शेख करीम शेख अफसर बिनविरोध

खामगांव (जनोपचार न्यूज नेटवर्क): खामगाव तालुक्यातील चिंचपुर येथील ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंचा सौ. रूपाली ताले यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक 28 मार्च रोजी पडली. यावेळी 11 पैकी  7 सदस्य उपस्थित होते. सरपंच पदांसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने शेख करीम शेख अफसर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 यावेळी  चिंचपूर ग्रामपंचायत च्या  उपसरपंच किरण प्रदीप सरदार, सदस्य संजय उपासे, प्रकाश गाडगे, रूपाली ताले, अर्चनाताई कदम, कुर्शीदबी रउप शाह ,  उपस्थित होते तर प्रशासनाच्या वतीने निवडणुक निरिक्षक म्हणून आर. बी. दिक्षित  मंडळ अधिकारी यांनी काम पाहीले. त्यांचेसोबत ग्रामसेवक तुकाराम राठोड , तलाठी बि.पी. शेळके हिवरखेड पोलीस स्टेशन चे साखरे साहेब, बस्सी साहेब प्रामुख्याने उपस्थित होते. निवड प्रक्रिया नंतर ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم