खामगाव ग्रामीण ग्रामपंचायत ने मोदींची स्वच्छ भारत मिशन योजना गुंडाळली?
![]() |
खामगाव ग्रामीण ग्रामपंचायतच्या हद्दीत कचऱ्यांचे ढीग, नागरिकांचे आरोग्य धोक्यात |
संपूर्ण देशात नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत मिशन योजना लागू केली मात्र खामगाव शहरालगतच असलेल्या खामगाव ग्रामीण ग्रामपंचायत ने स्वच्छ भारत मिशन योजना गुंडाळल्याचा समोर आल आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत खामगाव ग्रामीण ग्रामपंचायतच्या हद्दीत घंटागाडी नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून आहेत. गेल्या सहा महिन्यापासून या परिसरात घंटागाडी येत नसल्याचे नागरिक सांगत आहेत आणि कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खामगाव ग्रामीण ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे ग्रामपंचायतकडे फिरकतच नसल्याने खामगाव ग्रामीण ग्रामपंचायत तिच्या हद्दीत समस्या वाढल्या आहेत.
إرسال تعليق