सिध्दीविनायक टेक्निकल कॅम्पसमध्ये राज्यस्तरीय तांत्रिक कार्यक्रम संपन्न
शेगाव : जनोपचार न्यूज नेटवर्क – वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संचलित सिध्दीविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगाव येथे दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्य आय.एस.टी.ई. मान्यता प्राप्त राज्यस्तरीय तांत्रिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम मध्ये टेकनिकल प्रोजेक्ट चे उदघाटक म्हणून डॉ. संतोष गहूकर (व्यवस्थापकीय संचालक, CEO आणि PI-Agri Business Incubation Centre, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) लाभले व तसेच टेकनिकल पोस्टर प्रदर्शनी चे उद्घाटन सौ. अपर्णाताई सागर फुंडकर यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली या प्रसंगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत जी. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. अशोक कंकाळे, तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. प्रीती चोपडे यांची उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. संतोष गहूकर यांनी विद्यार्थ्यांना कृषी व्यवसाय उष्मायन केंद्र विषयी मार्गदर्शन केले, तर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अशोक कंकाळे यांनी डॉ. सी. व्ही. रमण यांनी रमण इफेक्टचा शोध लावला होता, त्यानिमित्त २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. हे विद्यार्थ्यांना पटवून दिले व कार्यक्रमास सुरुवात केली या मध्ये टेक्नीकल प्रोजेक्ट, पोस्टर प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स इंजिनिअरिंग व त्याच प्रमाणे बी. सी. ए. व बी. एस. सी. शाखांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमात 79 टेक्निकल प्रोजेक्ट्स आणि 29 पोस्टर सादर करण्यात आले, तर ३००+ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. UG स्तरावर प्रथम क्रमांक श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव च्या साहिल पी. माथूरकर, शुभम एस. सुरडकर, हृषीकेश एम. काकडे, यश एस. राऊत यांनी "स्मार्ट शहरांमध्ये जलस्रोतांच्या पायाभूत सुविधांच्या देखरेखीसाठी ड्रोन-आधारित वेअर्सची तपासणी आणि विश्लेषण" या प्रकल्पासाठी पटकावला, तर द्वितीय क्रमांक तुलसीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, नागपूरच्या अरविंद चैतराम ढगे, वैभव दुर्गे, सुशांत नामुर्टे, बादल निनावे यांच्या "एआय कापूस रोग वर्गीकरण सहाय्यक" प्रकल्पाला मिळाला. डिप्लोमा स्तरावर प्रथम क्रमांक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, खामगावच्या जयेश मनोहर खांडारे यांच्या " ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह अँड्रॉइड ॲप्लिकेशन वापरून एआय-आधारित लोड कंट्रोल सिस्टम " प्रकल्पाने मिळवला, तर द्वितीय क्रमांक सिध्दीविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगावच्या सार्थक दिलीप हरेश्वर, अनुप शांताराम चंदन, यशोदिप राजीव पांडे यांच्या " सांकेतिक भाषा अनुवादक " प्रकल्पाला मिळाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती चौधरी, ओम भीसे, वैशाली झाडोकर आणि वेदांत गव्हाणे यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे ॲकॅडेमिक डीन प्रा. धीरज वानखडे, प्रोग्राम कोऑर्डिनेटर प्रा. सुरेश अलासे, प्रा. निखिल निंबालकर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष मा. सागरभाऊ फुंडकर व संस्थेचे उपाध्यक्ष तथा कामगार मंत्री ॲड. आकाशदादा फुंडकर यांनी महाविद्यालयातर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
إرسال تعليق