खामगांव अर्बन बँकेस विदर्भ अर्बन बँक्स असोसिएशनचा पुरस्कार प्रदान
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- सभासद, ग्राहक व खातेदार यांचे सोबत "नातं विश्वासाचं" या ब्रिद वाक्यावर चालणाऱ्या दि खामगांव अर्बन को-ऑप. बँक या मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेने या वर्षात सलग तिसऱ्यांदा पुरस्कार प्राप्त करीत आपले नावलौकीकात आणखी भर घातली आहे. खामगांव अर्बन बैंकेस ३१ मार्च २०२४ च्या आधारावर उत्कृष्ट बैंकांसाठी असलेला रु. १००१ कोटी ते १०००० कोटी पर्यन्त डिपॉझीटचे गटातून द्वितीय क्रमांक मिळाला आहे. दि. ११/०२/२०२५ रोजी शेगांव येथे विदर्भ अर्बन बैंक्स असोसिएशनच्या दोन दिवशीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे सहकार, गृहनिर्माण तसेच शालेय शिक्षण मंत्री ना. पंकजजी भोयर साहेब, असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र दुरगकर, उपाध्यक्ष सतिषजी गुप्त, सचिव तुषारकांती डवले यांचे हस्ते बँकेस स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. बँकेचे संचालक डॉ. मोहनराव बानोले, संचालिका सौ. कल्पनाताई उपरवट, सौ. मनिषाताई माटे यांनी सदर पुरस्कार बँकेतर्फे स्वीकारला.
![]() |
...........जाहिरात......... |
सभासद खातेदारांचा विश्वास, संचालक मंडळाचे सुयोग्य धोरण व कर्मचाऱ्यांचे मेहनतीमुळेच बँकेस हे यश मिळाल्याचे मनोगत अध्यक्ष प्रा. विजयजी पुंडे यांनी व्यक्त केले. बँकेच्या मेहकर शाखेचा नुकताच दि. २५ जानेवारी रोजी शुभारंभ झाला असून सर्वांच्या सहकार्यामुळे ३१ मार्च २०२५ पर्यन्त बँकेच्या नांदुरा व जळगांव जामोद या दोन नविन शाखांचा शुभारंभ होईल, खामगांव अर्वन बँकेच्या प्रगतीचे सातत्य भविष्यातही कायम राहील असा विश्वास व्यक्त केला.
असोसिएशनच्या या दोन दिवशीय अधिवेशनात नागरी सहकारी बँकांपुढील विविध समस्या, भारतीय रिझर्व बैंक तसेच सरकारकडून सहकारी बँकांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना याबाबतचे विवेचन करण्यात आले. अधिवेशनास विदर्भ अर्बन बँक्स असोसिएशनचे पदाधिकारी व विदर्भातील सर्व बँकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
إرسال تعليق