"टुटते रिश्ते बिखरते परिवार" या एक दिवसीय कार्यशाळेचे खामगावांत आयोजन


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-सध्या कौटुंबिक नात्यातील वाढती अंतरे हा समाजासाठी चिंतेचा विषय बनला आहे. कुठलाही समाज संगठीत ठेवायचा असेल आवश्यकता आहे एका सुदृढ परिवाराची. परिवारातील नाते संबंधांमध्ये वाढत जाणारा दुरावा हा एक चिंतनीय विषय ठरतोय. उदाहरणार्थ, शिकलेल्या लोकांद्वारे वाढलेले आत्महत्यांचे प्रमाण, मुहूर्त बघून आणि कुंडल्यांद्वारे गुणांचे मेलमिलाप केलेल्या लग्नानंतरदेखील वाढत जाणारे घटस्फोटांचे प्रमाण किंवा परिवारांमध्ये असलेला संवादांचा अभाव इत्यादी.

या विषयांचे गांभीर्य आणि यांच्यामुळे होणारा सामाजिक असमतोल लक्षात ठेऊन एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सकल हिंदू समाज व समस्त व्यापारी असोशिएशन खामगांव यांचेद्वारे माननीय नामदार एडवोकेट आकाशजी फुंडकर (महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री व पालकमंत्री अकोला जिल्हा) यांच्या अध्यक्षतेखाली येत्या रविवारी म्हणजेच दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ७.१२ ते ९.३० या दरम्यान श्री अरजण खिमजी नॅशनल हायस्कूल खामगांव येथे करण्यात आलेले आहे.

या अत्यंत गंभीर विषयावर योग्य मार्गदर्शन मिळावे आणि पारिवारिक सलोखा सतत कायम राहावा या भावनेने सुप्रसिद्ध शांतीदूत आचार्य श्री महाश्रमणजी यांचे पट्टशिष्य श्री अहर्तकुमारजी ठाणा-३ यांच्या "टुटते रिश्ते बिखरते परिवार" या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यशाळेप्रसंगी परिणामकारकता साधावी म्हणून एका आकर्षक नाटिकेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तरी खामगांव शहरातील सर्व जागरूक जनतेने सहपरिवार या कार्यशाळेस आपली उपस्थिती नोंदवावी अशी विनंती आयोजक सकल हिंदू समाज व समस्त व्यापारी असोसिएशन खामगावद्वारे करण्यात आलेली आहे

Post a Comment

أحدث أقدم