विदर्भाची जलद धावपटू कु. प्रणाली हिची क्रीडा महोत्सवासाठी निवड 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:  श्रीमती .एस .आर. मोहता महिला महाविद्यालयाची बी कॉम भाग एक ची विद्यार्थिनी कु.प्रणाली संजय शेगोकार हिची दिनांक 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2025 गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या 26 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ ॲथलेटिक्स संघात 5000 मीटर धाव ,1500 मीटर धाव ,4  × 400 मीटर रीले स्पर्धेत करिता प्रणालीची निवड झाली आहे .यापूर्वीही झालेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी  क्रॉस कंट्री स्पर्धा बेंगलोर  कर्नाटक येथे कुमारी प्रणालीची अकराव्या क्रमांकावर निवड होऊन ,खेलो इंडिया साठी पात्र  ठरली  आहे . तसेच ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी भुवनेश्वर येथे झालेल्या ॲथलेटिक स्पर्धेत सुद्धा  प्रणालीने आठव्या क्रमांकावर येऊन ,खेलो इंडिया साठी पात्र झाले आहे .अशा या  महाविद्यालयाच्या हिरकणीचा दि. नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी , प्रभारी प्राचार्य डॉ. वसंत डोंगरे ,खेळ विभाग प्रमुख प्रा. डॉ.सीमा देशमुख, सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृद्ध यांनी अभिनंदन केले आहे. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे.


Post a Comment

أحدث أقدم