भाजपाच्या वतीने जनसेवेत असलेल्या नारीशक्तींचा सन्मान

माजी प.स.सभापती सौ उर्मिलाताई गायकी यांचा उपक्रम

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क ::-  समाजात जनसेवेत असलेल्या महिलांचा नारीशक्ती सन्मान सोहळा भाजपाच्या वतीने 9 फेब्रुवारी रोजी सुटाळा बु. येथे पार पडला. 

          राज्याचे कामगार मंत्री ना. अँड.आकाश फुंडकर, भाजपा सोशल मीडिया सेलचे प्रदेश संयोजक सागरदादा फुंडकर, व भाजपा खामगाव जिल्ह्याचे महामंत्री शरदचंद्रजी गायकी यांच्या मार्गदर्शनाखाली या  अनोख्या उपक्रमाचे आयोजन पंचायत समितीच्या माजी सभापती सौ उर्मिलाताई गायकी यांच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.या सोहळ्यात सुटाळा - वाडी  जिल्हा परिषद सर्कलच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा सेविका, बचत गट सीआरपी ,बचत गट पदाधिकारी, ग्रा प सदस्या, सरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्या नगरसेविका यांच्यासह समाजसेविका व भाजपा महिला मोर्चाच्या प्रमुख पदाधिकारी अशा सुमारे 700 नारीशक्ती उपस्थित होत्या.

 यावेळी सौ  उर्मिलाताई गायकी  यांनी सर्व नारीशक्तींचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. उपस्थित सर्व नारी शक्तींशी याप्रसंगी मुक्त संवाद व चर्चा करण्यात आली. तसेच त्यांच्या वैयक्तिक व सामाजिक क्षेत्रातील समस्या जाणून घेण्यात आल्या. या समस्या पूर्ण करण्यासाठी आपले लाडके भाऊ राज्याचे कामगार मंत्री अँड आकाश फुंडकर यांच्यासमोर मांडणार असल्याची माहिती यावेळी सौ उर्मिलाताई गायकी यांनी दिली. सन्मान  व चर्चा संवाद नंतर माघी एकादशी च्या पर्वावर आयोजित या सोहळ्याचा समारोप सर्वांच्या स्नेह भोजनानंतर आटोपला. या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस शरदचंद्रजी गायकी, भाजपा महिला आघाडी खामगाव जिल्हाध्यक्षा सौ सारिकाताई डागा , माजी नगरसेविका भाग्यश्री ताई मानकर, श्रद्धा ताई धोरण, रत्नाताई डीक्कर,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


Post a Comment

أحدث أقدم