स्वर्गीय बाळासाहेब बिनिवाले उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्राप्त 

श्रीधर ढगे यांचा अल्प परिचय

जेष्ठ पत्रकार श्रीधर निवृत्ती ढगे यांचे मूळ गाव शेगाव तालुक्यातील चिंचोली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण शेगाव येथे झाले.   खामगाव येथील स्वर्गीय भास्करराव शिंगणे महाविद्यालयात  त्यांनी कला शाखेतील  बी. ए. पदवी आणि नंतर संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती मधून पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात मास्टर डिग्री  MMC प्राप्त केली.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच  दैनिक देशोन्नती खामगाव उपसंपादक म्हणून रुजू झाले.त्यानंतर पुण्यगरी, सामना प्रतिनिधी,प्रश्नकाल मध्ये उपसंपादक, साम टीव्हीच्या ॲग्रोवन बातमीपत्रासाठी   वऱ्हाड प्रतिनिधी, सिटी न्यूज सुपरफास्ट मध्ये  खामगाव कार्यालय प्रमुख, प्रतिनिधी  दैनिक सकाळ कार्यालय प्रमुख खामगाव, सध्या ओटीटी मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये  मॅनेजिंग डायरेक्टर आणि    संपादक, आणि न्यूज-24 नॅशनल चैनल चे जिल्हा प्रतिनिधी आहेत. पत्रकारितेच्या  या प्रवासात श्रीधर ढगे यांनी महाराष्ट्र धर्म, द रिपब्लिक ही वर्तमानपत्र सुद्धा काढली. अमोल अंधारे संपादक असलेल्या सांज दैनिक बजरंगी मध्ये सुद्धा त्यानी काम केलेलं आहे. शेगाव येथील विजय भालतिडक यांचा सत्याचा मार्ग, त्यांनी काम केलेली दैनिक खूप लोकप्रिय ठरली. 

 श्रीधर ढगे  यांचे वडील स्वर्गीय निवृत्ती ढगे  कीर्तनकार असल्याने  संत तुकाराम महाराजांच्या सुधारणावादी, बुद्धी प्रामाण्यवादी  विचारांचा पगडा श्रीधर ढगे यांच्यावर बालपणापासूनच होता. सुरवातीला कथा कविता आणि स्पूट लेखनातून त्यांनी हा विचार मांडला. पूर्वी मोठी वर्तमानपत्र साहित्यिकांना सुद्धा मानधन देत असतं. लोकसत्ता मधील रविवारीय पुरवणीमध्ये लिहा असे पत्र, आणि मानधनाचा चेक त्यावेळी जेष्ठ साहित्यिक वामन तेलंग यांच्याकडून महाविद्यालयीन जीवनात प्राप्त झाला तेव्हा पासून लिखाणाची श्रीधर ढगे यांची लिखाणाची  आवड वाढत गेली.

 पत्रकारिता करत असताना   अंधश्रद्धा निर्मूलन,  जातीय सलोखा, वंचितांचे प्रश्न, कामगार, शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नांवर वेळोवेळी लिखाण करून न्याय मिळवून दिला.खामगाव दंगल झाली असता  जातीय सलोख्यावर लिखाण केल्यामुळे  तत्कालीन  देशोन्नती चे कार्यकारी संपादक राजेश राजोरे यांनी संपादकीय विभागाच्या  बैठकीत  पाठीवर कौतुकाची थाप देत  विशेष बक्षीस दिले होते. या पूर्वी आद्य महिला संपादिका तानूबाई बिरजे जिल्हास्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. आता खामगाव प्रेस क्लबच्या वतीने दिल्या जाणारा  स्वर्गीय बाळासाहेब  बिन्नीवाले पत्रकारिता पुरस्कार सहा जानेवारी रोजी श्रीधर ढगे यांना  आहे. यावेळी राज्याचे कामगार मंत्री ऍड. आकाशदादा फुंडकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, वंचित बहुजन आघाडी पार्लमेन्ट्री बोर्ड राज्य सदस्य अशोकभाऊ सोनोने, देशोन्नती चे बुलडाणा आवृत्ती संपादक राजेश राजोरे,खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोर भोसले, सचिव अनिल खोडके यांची उपस्थिती होती. उल्लेखनीय म्हणजे संघटना बांधणी करताना त्यांनी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष, टीव्ही जर्नलिस्ट संघटना जिल्हा प्रवक्ता, मराठा सेवा संघ प्रणित तानू बाई बिर्जे पत्रकार परिषद बुलडाणा जिल्हा अध्यक्ष अशा विविध पदावर काम केले आहे.

पत्रकारिता करताना देशोन्नतीचे आवृत्ती संपादक श्री. राजेश राजोरे, जेष्ठ पत्रकार स्वर्गीय नागोराव अनोकार, सांज दैनिक प्रश्न कालचे व्यवस्थापक श्री सतीश अप्पा दुडे, श्री पुरुषोत्तम आवारे पाटील, जेष्ठ पत्रकार श्री. राहुल पहुरकर, न्यूज 24 चे महाराष्ट्र हेड विनोद जगदाळे, जेष्ठ पत्रकार सुधाकर खुमकर,दैनिक सकाळचे तत्कालीन अकोला आवृत्ती संपादक संदीप भारंबे, जेष्ठ पत्रकार सचिन लहाने, जेष्ठ पत्रकार श्री. काकाजी रूपारेल, कुणबी समाजदूत चे संपापक श्री. अनिल खोडके, जेष्ठ श्री. संजय सोनोने,  जेष्ठ पत्रकार श्री. अनिल उंबरकर, डॉ. नितीन निमकर्डे, जनोपचार न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक श्री नितेश मानकर यांचे मार्गदर्शन लाभले. श्री. श्रीधर ढगे यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा...!

--महादेव राऊत, पत्रकार शेगाव

Post a Comment

أحدث أقدم