केस गळतीमुळे अनेक गावात भीतीचे वातावरण?
![]() |
प्रासंगिक छायाचित्र |
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- अचानक महिला पुरुषांच्या डोक्यावरील केस गळती होत असल्याने शेगाव तालुक्यातील काही गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. डोक्यावर हात फिरतच अनेकांच्या हातात केसांचा गुच्छा येत असल्याने हा नेमका प्रकार आहे तरी काय असा सवाल उपस्थित केल्या जात आहे. बोंडगाव व पहूरजिरा सह काही गावात सध्या केसांची गळती होत असल्याची वार्ता पसरत आहे. काही जणांसोबत हा प्रकार घडल्याने भीतीचे वातावरणही पसरले असून आरोग्य विभागासमोर हे नव्हे आव्हान तर नाही ना असेही या निमित्ताने बोलल्या जात आहे.आरोग्य विभागाने अलर्ट होऊन नेमका प्रकार काय आहे हे शोधून काढावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात व्हायरस ने थैमान घातले असून, कुटुंब ची कुटुंब या व्हायरस चा बळी ठरत आहेत अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, यास तिन्ही गावातील शेकडो नागरिकांची केस गेली असून महिलांची संख्याही लक्षणीय आहे मात्र एवढ्या भांकर प्रकार होऊनही आरोग्य विभाग अनभिन्न आहे, त्यामुळे नागरिक खाजगीत उपचार घेत आहेत. शाम्पू ने किंवा दूषित पाण्यामुळे असा प्रकार घडत असावा असे डॉक्टरांचे मत असले तरी कधीही आयुष्यात शाम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना शेगाव तालुका शिवसेनाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी निवेदन देऊन या गंभीर बाबीची दखल घेऊन त्वरित सदर गावांमध्ये उपचार शिबिरे राबवण्याचे आवाहन केले आहे तसेच जिल्ह्याचे खासदार व केंद्रीय आयुषमंत्री नामदार प्रतापरावजी जाधव यांच्याशीही फोनवरून संपर्क साधून या गंभीर बाबी बाबत अवगत केले आहे वृत्त लिही पर्यंत या गावामधे आरोग्य विभागाने कोणतीही ठोस उपाय योजना केली नहोती .
कालवड, बोंडगाव व हिंगणा या गावामधे केस गळतीची समस्या नागरिकांना जाणवत असून आपोआप टक्कल पडत आहेत याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गीते यांना निवेदन दिले असून, केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांना सुद्धा सांगितले आहे
إرسال تعليق