आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरम च्या वतीने वंचित चे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे समाज गौरव पुरस्काराने सन्मानित
शेगांव जनोपचार न्यूज नेटवर्क :- आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरम च्या वतीने आयोजित मूकनायक पत्रकार दिन व संविधान अमृत महोत्सव सन्मान सोहळा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम वानखडे केंद्रीय अध्यक्ष आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरम हे होते कार्यक्रमाचे उद्घाटक सिने अभिनेते गगन मलिक होते स्वागत अध्यक्ष प्रकाश सरदार केंद्रीय सचिव हे होते सदर कार्यक्रमाची सुरूवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून व त्रिशरण पंचशील घेऊन कऱण्यात आली नंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना संघटनेच्या वतीने समाज गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी सिने अभिनेते गगन मलिक ज्येष्ठ पत्रकार दादाभाऊ अभंग ज्येष्ठ पत्रकार पोपट कांबळे.व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला सदर कार्यक्रमात राष्ट्रीय प्रबोधनकार राहुलदादा अनविकर यांना सुध्दा कला गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
إرسال تعليق