थरार क्षणा क्षणाचा.. बळीराजाच्या जिव्हाळ्याचा..

हिवरखेड येथे भव्य जंगी शंकर पटाचे उदघाटन थाटात

कृषिप्रधान संस्कृतीचा कणा आणि अन्नदाता शेतकऱ्याच्या सन्मानार्थ हिवरखेड येथील जंगी श्री बिंद्राबन बाबा भव्य शंकरपटाचे उदघाटन दिनांक 30 जानेवारी रोजी मा.श्री.दादासाहेब लोखंडकार यांच्या हस्ते पार पडले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच मा.श्री.मनोहरभाऊ फुंडकर होते. तर विशेष अतिथी म्हणून श्री.किशोरजी भोसले,श्री.संभाजीराव ताले,श्री.हिवाळे,मुबारक खान,श्री.नितेश मानकर,श्री.आनंद गायगोड,श्री,आकाश पाटिल,ठाणेदार पोलीस स्टेशन हिवरखेड मा.कैलाश चौधरी साहेब उपस्थित होते.

शेतकरी राजाचा मानसिक तणाव शंकरपटातून दूर करण्याचा आमचा मानस- गजानन लोखंडकार 

तसेच श्री.प्रभाकरजी वरखेडे,श्री.महादेव बोचरे,श्री.वासुदेव खंडारे,श्री.भिकाजी खंडारे,श्री.श्रीराम खंडारे,श्री.राजाभाऊ लोखंडकार,श्री.अशोकराव देशमुख,श्री.श्रीराम गायगोल,श्री.गजानन उगले,श्री.रमेश कडाळे,श्री.शांताराम बाठे,श्री.गोपालभाऊ खंडारे,श्री यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पहिल्या मानाच्या जोडीचे पूजन करून सर्व शेतकऱ्यांच्या साक्षीने उदघाटकीय नारळ फोडण्यात आले. यावेळी नारळ फोडतात जोरदार ललकार आणि आपल्या मालकाचा आवाज ऐकताच मानाच्या जोडीने उदघाटकीय फीत कापून प्रचंड वेगाने आपली शर्यत पूर्ण केली. आणि श्री उल्हासभाऊ दाभाडे (घड्याळवाले) यांनी मान्यवरांच्या परवानगीने उदघाटन झाल्याची घोषणा केली.

दोन दिवसाच्या शंकर पटातून शेतकरी राजाचा वर्षभराचा मानसिक तणाव दूर करण्याचा आमचा मानस: गजानन लोखंडकार 

                                   वर्षभर शेतात राबराब राबणारा शेतकरी राजा हा नेहमी तणावात असतो, त्यांचा तणाव व थकवा दूर करण्यासाठी आणि त्यांचे मनोरंजन करण्यासाठी या मातीतल्या खेळाचे आयोजन आम्ही रेणूका फाऊंडेशन च्या वतीने केले असून दरवर्षी हा शंकर पट आम्ही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात आयोजित करीत असतो.

           सदर समारंभाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे सर्व सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم