डॉ. नितीश जगदीश अग्रवाल यांचा परिचय
डॉ. नितीश अग्रवाल यांचा जन्म खामगाव येथे झाला असून स्थानिक लॉयन्स ज्ञानपीठ येथे त्यांनी 10 वी पर्यंतचे शिक्षण घेऊन प्रावीण्य प्राप्त केले. पुढे अकरावी बारावी त्यांनी प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून केले. एम. बी. बी. एस. आणि एम. एस. ऑर्थो. चे शिक्षण त्यांनी नागपूर आणि नाशिक येथून पूर्ण करून उच्च शिक्षण गुडघाबदली शस्त्रक्रिया फेलोशिप आणि दुर्बिणीद्वारे अर्थोस्कोपी फेलोशिप- मुंबई आणि ऑस्ट्रेलिया येथे घेतले.
मोठ्या मिळकत करिता मोठ्या शहरात न जाता आपली जन्मभूमी खामगाव येथील रुग्णांना दुसऱ्या शहरात जाऊन उपचार घेण्याचा त्रास होऊ नये, याकरिता खामगाव शहरातच उपचार सेवा उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने त्यांनी 5 वर्षांपूर्वी खामगाव शहरात अग्रवाल हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा सुरू केली.
या 5 वर्षांमध्ये गरजू रुग्णांसाठी त्यांनी आतापर्यंत 51 शिबिरांचे आयोजन केले. या शिबिरांच्या माध्यमातून अंदाजे 11,000 गरजू रुग्णांची मोफत तपासणी व मोफत औषधांचे आयोजन करून सेवा प्रदान करण्यात आली. आणि ही सेवा पुढेही निरंतर सुरू राहील, असा त्यांचा मानस आहे.
आतापर्यंत, खामगाव शहरात त्यांनी अनेक जटिल शस्त्रक्रिया माफक दरात यशस्वीरित्या करून नावलौकिक मिळविला आहे.
त्यांच्या या सेवा कार्यात त्यांच्या सुविज्ञ पत्नी स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. शारदा अग्रवाल या सुद्धा नेहमी सम्मिलित असतात.
विशेष म्हणजे खामगाव शहरातील आमचे जेष्ठ पत्रकार आणि समाजसेवी श्री. जगदीशजी अग्रवाल यांचे ते चिरंजीव आहेत.
डॉ. नितीश यांना त्यांच्या वडिलांप्रमाणे पत्रकारिता क्षेत्राचीही आवड आहे. एम. बी. बी. एस. चे शिक्षण घेत असतांना, नागपूर कॉलेजमध्ये "स्पलॅश" नावाने न्यूजलेटर ची त्यांनी सुरुवात केली होती.
त्यांच्या वैद्यकीय सेवेची दखल घेऊन प्रेस क्लब खामगाव द्वारे त्यांना जिल्हा वैद्यकीय सेवा पुरस्कार, पत्रकार दिनी 6 जानेवारी रोजी देण्यात येत आहे.
- संभाजीराव टाले,
पत्रकार, खामगाव
إرسال تعليق