भव्य रंगभरण चित्रकला स्पर्धा आदर्श ज्ञानपीठ येथे संपन्न
खामगांव - स्थानिक घाटपुरी नाका परिसरातील आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे भव्य रंगभरण चित्रकला मोठ्या उत्साहात पार पडली. विध्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास, शैक्षणिक विकास व्हावा तसेच विदयार्थ्यांचा कलागुणांना वाव मिळावा या करीता तरुणाई फाउंडेशन व आदर्श ज्ञानपीठ यांच्या संयुक विदयमानाने भव्य रंगभरण चित्रकला स्पर्धेचे आयोजन आदर्श ज्ञानपीठ येथे करण्यात आलेले होते.
यास्पर्धेत वर्ग 1 ते वर्ग 7 चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्साही वातावरणात विविध चित्रांवर सुंदर रंग भरून आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना उजाळा दिला.स्पर्धेच्या यशस्वी ते करीता आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता पळसकर, जेष्ठ शिक्षिका सौ ममता महाजन, पर्यवेक्षिका सौ प्रियंका राजपूत, सौ ज्योती वैराळे, कु माधुरी उगले, सौ कल्पना कस्तुरे, सौ अलका वेरूळकर, सौ प्रिया देशमुख, सौ सारिका सरदेशमुख, कु दामिनी चोपडे, सौ अक्षरा इरतकर, सौ प्रियंका वाडेकर, सौ अर्चना लाहूडकर, कु मिनल लांजूडकर, सौ नम्रता देशमुख, श्रीमती स्वाती निंबोकार, सौ कोमल आकणकर, सौ अश्विनी वकटे, श्रीमती सपना हजारे, सौ संगीता पिवळटकर, सौ वंदना गावंडे, सौ सुवर्णा वडोदे, सौ प्रतिभा गावंडे, सौ राजकन्या वडोदे, सौ मीरा कांदिलकर आदींनी प्रयत्न केले.
إرسال تعليق