शासनाने स्मार्ट मीटर लावण्याचे धोरण रद्द करा: गणेश भाऊ चौकसे मित्र मंडळाचे महावितरणला निवेदन
खामगाव प्रतिनिधी: शहरात पुन्हा एकदा स्मार्ट मीटर लावण्याची तयारी सुरू झाली आहे.वीज ग्राहकांची कसलीही व कुठलीही मागणी नसताना वीज ग्राहकांना जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावण्याचा महावितरण कंपनीची मोहीम सुरू आहे. या मीटरमुळे ग्राहकांचा कुठलाही फायदा होणार नाही उलट ग्राहकांच्या माथी हे मीटर मारत असल्याने शासनाने स्मार्ट मीटर लावण्याचे धोरण रद्द करण्याची मागणी गणेशभाऊ चौकसे मित्र मंडळाच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद आहे की,खामगांव मध्ये जिनियस (GENUS) कंपनी कडून स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यास सुरवात करण्यात आली आहे. वास्तविक २००३ विद्युत अधिनियम नुसार ग्राहकांना आपणास कोणते मीटर बसविण्यात यावे याबाबत स्वातंत्र आहे तसेच ग्राहकांच्या लेखी संमती शिवाय ग्राहकाना स्मार्ट प्रीपेड मीटर बसविणे बेकायदेशीर आहे.ग्राहकांचे मीटर सुस्थितीत असतांना पण मीटर बदलण्यात येत आहे.
तसेच नवीन वीज पुरवठा घ्यायचा असल्यास ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यास सक्ती करण्यात येत आहे.ग्राहकांच्या लेखी संमती शिवाय मीटर बदलण्यात येवू नये. त्याबाबत भरपूर तक्रारी होत आहेत.विजेचे सध्याचे मीटर बदलून स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्यात येणार आहे. हे मिटर एखाद्या मोबाईल प्रमाणे कार्य करणार आहे. रिजार्च संपला की मोबाईलची सेवा बंद होईल. याचा ग्राहकांना मनस्पात होईल. तसेच काही खासगी कंपन्यांना याचा फायदा होईल. त्यामुळे स्मार्ट प्रिपेड मीटरलावू नका, अशी मागणी महावितरणचे मुख्य अभियंता यांना निवेदन देऊन करण्यात आली. हे निवेदन गणेश भाऊ चौकसे मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांच्या सहीनिशी पाठविण्यात आले आहे.सदर निवेदनाच्या प्रती मुख्य अभियंता, परिमंडळ कार्यालय म. रा. वि. वि. कंपनी मर्यादित,रतनलाल प्लॉट दुर्गा चौक, अकोला,अधीक्षक अभियंता, मंडळ कार्यालय, म रा वि वि कंपनी मर्यादित, सुंदर नगर, बुलढाणा,कार्यकारी अभियंता, विभागीय कार्यालय, म रा वि वि कंपनी मर्यादित, खामगांव यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.
إرسال تعليق