आ. सत्यजितदादा तांबे यांच्या हस्ते जय हिंद लोक चळवळीच्या दिनदर्शिकेचे विमोचन
खामगाव : जयहिंद लोकचळवळ बुलढाणाच्या वतीने यावर्षी सुद्धा ' दिनदर्शिका 2025' प्रकाशित करण्यात आली असून, आज नाशिक येथे आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले.
जय हिंद लोक चळवळीचे कार्य, उद्देश आणि उपक्रम तसेच दैनंदिन माहिती या दिनदर्शिकेत देण्यात आलेली आहे. बुलडाणा जिल्ह्यात या दिनदर्शिकेच्या पाच हजार प्रति नागरिकांना मोफत वितरित केल्या जाणार आहेत.
बुलढाणा जय हिंद लोक चळवळीच्या वतीने आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवल्या जातात. 2024 मध्ये बुलढाणा जय हिंद लोक चळवळीने सामाजिक कार्यात राज्यातून दुसरा क्रमांक पटकावला होता. तर मागील वर्षी जय हिंद लोक चळवळ बुलढाणा च्या वतीने परिपूर्ण माहिती असलेली दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली होती. नागरिकांनी चांगली पसंती दिली. जय हिंद लोक चळवळीचा विचार घरा घरात पोहोचवण्यासाठी दिनदर्शिका हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरला. त्यात सातत्य ठेवत यावर्षी सुद्धा बुलढाणा जय हिंद लोकचळवळीने सन 2025 ची विविध माहिती असलेली दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. नाशिक येथे आ. सत्यजित दादा तांबे यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी आमदार सत्यजितदादा तांबे यांनी दिनदर्शिका चे अवलोकन करून या उपक्रमाचे कौतुक केले.
याप्रसंगी बुलढाणा जय हिंद लोक चळवळीचे समन्वयक स्वप्निल ठाकरे पाटील, ओटीटी न्यूज चे संपादक श्रीधर ढगे, जय हिंद लोक चळवळीचे सदस्य रुपेश पाकदाणे, सजनपुरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य शेख इम्रान यांची उपस्थिती होती.
إرسال تعليق