श्री सरस्वती इंग्लिश स्कूल अंत्रज येथे श्री .संताजी महाराज जयंती उत्साहात

डॉ.भूषणजी कर्डिले  यांचा वाढदिवस संस्थेच्या वतीने संगणक शिक्षणासाठी 10 विद्यार्थी दत्तक घेऊन साजरा !

 खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क -  येथून जवळच असलेल्या  श्री. सरस्वती इंग्लिश स्कूल  अंत्रज येथे आज 08 डिसेंबर2024 ला  श्री. संत शिरोमणी श्री संताजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात   आली 

श्री.संताजी महाराज  नावाने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना या वर्षी देखील लागू करण्यात आली तर  दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळावे या उद्देशाने 

डॉ.भूषणजी कर्डिले महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग मा सदस्य ,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महासचिव महाराष्ट्र राज्य  यांच्या  वाढदिवसाचे  औचित्य साधून  चालु शैक्षणिक सत्राकरीता  10  विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणासाठी  दत्तक घेण्याचा निर्णय संस्थेच्या वतीने  घेण्यात आला .संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत चोपडे  यांनी सांगितले .तर संस्थेच्या संचालीका सौ. चोपडे मॅडम यांनी महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकत महापुरुषांच्या नावाने विविध उपक्रम, खेळ , स्पर्धा राबविण्याचा संस्थेचा संकल्प आहे .शाळेच्या  मुख्याध्यापिका सौ.काळबांदे मॅम, शिक्षक निमकाळे सर  यांनी महापुरुषांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .संस्थेचे मार्गदर्शक निलेश चोपडे यांनी देखील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सागितले तर कार्यक्रमांचे  सुत्रसंचालन कु.मेघा बेलोकर यांनी केले त्यावेळी महाले मॅम, सरप मॅम, घाटे मॅम, इंगळेमॅम,बोचरे मॅम  कर्मचारी हिंगणकार ताई ,शैलेश गिरे, सहदेव वाघ, शुभम खेडकर यांची उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم