डीवायएसपी विनोद ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश!

आर्थिक प्रलोभन दाखवुन फसवणुक करणाऱ्या टोळीचा पडदा फाश

नकली नोटा, नकली सोने दाखवुन करत होते फसवणुक:९ पैकी ६अटक

 खामगाव (नितेश मानकर) :- आर्थिक प्रलोभन दाखवुन फसवणुक करणारे 4 ते 5 गुन्हेगारांच्या टोळया निष्पन्न झाल्या असुन त्यांचे गुन्हेगार टोळीवर सुध्दा महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 (मोक्का) प्रमाणे कार्यवाही करण्याची कार्यवाही सुरु आहे. संघटित गुन्हे करणाऱ्या टोळींमधील आरोपी करण्यात आली असून नऊ आरोपीविरुद्ध ही कारवाई करण्यात असून सहा आरोपींना जेरबंद करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार रामकृष्ण पवार, ठाणेदार आलेवार, पूर्वी डीवायएसपी वंदना कारखेले उपस्थित होते.

 पोलीस स्टेशन नांदुरा जि बुलडाणा येथे फिर्यादी राजेंद्रकुमार प्रकाशचंद्र अग्रवाल वय 55 वर्ष धंदा व्यापार रा. प्लॉट नं 5 शाकुंतल जीवनछाया नगर रोड पडोले हॉस्पीटल समोर नागपुर यांनी दि. 30.09.2024 रोजी 12.49 वा रिपोर्ट दिला की, त्यांचे नातेवाईक प्रसाद भट हे दलालीचे काम करतात. त्यांनी फिर्यादीला सांगीतले की, नांदुरा येथे अॅल्युमिनीयम चा 150 टनचा व कॉपरचा 50 टन माल आहे. जर तुम्हाला माल पाहिजे असेल तर संबंधीत दलाल यांचा मो नं 6361295092 हा मोबाईल नंबर मला दिला. त्यानुसार मी सदर मोबाईल धारकास संपर्क केला असता, टु कॉलरवर त्याचे नांव कृष्णकुमार असे दिसुन आले. त्यांचेशी बोलणी करुन मी व माझ्या साळयाचा मुलगा हर्ष शशिकांत खेमुका असे फोरव्हीलर ने नागपुर येथुन माल पाहण्यासाठी नांदुरा करीता निघालो. 12.00 वा नांदुरा येथे पोहचुन पुन्हा सदर नंबरवर संपर्क केला असता, सदर मोबाईल धारकाने मला अॅल्युमिनीयम असलेल्या गोडावुन चे लोकेशन टाकले. त्यानुसार मी सदर ठिकाणी जाण्यासाठी निघालो. नांदुरा पासुन 8 किलोमिटर अंतरावर सदर लोकेशन दिसत होत. परंतु काही अंतर गेल्यानंतर लोकेशन दिसत नसल्याने मी त्याला पुन्हा फोन लावला असता, त्याने दोन बिना नंबरच्या मोटार सायकली घेवुन आले. त्यांचे मोटार सायकली मागे आम्ही गाडी घेवुन निमगांव नारखेड, जंगलात पोहचलो. तेथे आम्हाला थांबण्यास सांगीतले. थोड्या वेळाने तेथे 10 ते 12 लोक अंदाजे 25 ते 30 वर्ष वयोगटातील आमचे गाडीसमोर येवुन त्यांनी जबरदस्तीने गाडीचा दरवाजा उघडला. आम्हाला हातातील चाकुचा धाक दाखवुन बाहर निकलो असे म्हणून गाडीची चाबी काढली. जबरीने माझ्या गळयातील सोन्याची चैन, वजन तिन तोळे कि 2,00,000/- रु हाताचे करंगळीतील सोन्याची अंगठी हिरा असलेली किं 2,00,000/- रु, करंगळीचे बाजुचे बोटातील सोन्याची अंगठी पन्ना असलेली किं 1,00,000/- रु, नगदी 15,000/- रु फोन पे वरुन 40,000/- रु, त्यांचे मोबाईलवर ट्रान्सफर केले. विवो कंपनीचा मोबाईल किं 20,000/- रु, युनियन बँकेचे डेबीटकार्ड आधारकार्ड असा माल जबरीने चाकुचा धाक दाखवुन काढुन घेतला. तसेच माझ्या सोबत असलेले हर्ष शशिकांत खेमुका यांचे जवळुन तिन ते चार लोकांनी चाकुचा धाक दाखवुन गाळयातील सोन्याची चैन वजन 3 तोळे किं 2,00,000/- रु फॉलीश कंपनीची मनगटी घड्याळ किं 20,000/- रु, अॅपल कंपनीचा मोबाईल फोन किं.1,00,000/- रुपये, एक अॅन्ड्राईड मोबाईल किं 10,000/- रु. फोन पे वरुन 5000/- रु ट्रान्सफर करुन घेतले. असा एकुण दोघांचा मिळुन किंमती 9,10,000/- रु चा मुददेमाल जबरीने काढुन घेतला अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरुन पो स्टे नांदुरा येथे अप नं 563/24 कलम 310(2) भारतिय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयात आतापावेतो तपासादरम्यान नांदुरा पोलीसांनी आरोपीतांना निष्पन्न करुन अटक केली 6 आहे. उर्वरित आरोपी फरार आहेत. अटक आरोपीतांची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्याचेकडुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालमत्तेपैकी नगदी 15,000/- रुपये गुन्हयात वापरलेल्या तिन मोटार सायकली, गुन्हयात वापरलेले पाच मोबाईल फोन असा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.


सदर गुन्हयाचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे की, गुन्हयातील अटक व निष्पन्न आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन ते संघटीत पणे टोळी तयार करुन गुन्हे करीत आहेत. त्यांनी मागील दहा वर्षात संघटीतपणे केलेल्या गुन्हेगारी मध्ये दरोडा घालणे, दुखापत करणे, फौजदारीपात्र कट रचणे, गुन्हयात घातक शस्त्राचा वापर करणे, दंगा करणे, शासकिय कर्मचारी यांचेवर हमला करणे, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे केलेले असल्याचे व ते सर्वजण टोळीप्रमुख संतोष शामराव सोनवणे याचे मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर प्रकरणात मा. विशेष पोलीस महानिरिक्षक अमरावती परिक्षेत्र अमरावती यांचे आदेशानुसार दि. 08.12.2024 रोजी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 (मोक्का) चे कलम 3(1)(ii), 3(2), 3(4) प्रमाणे वाढीव कलम समाविष्ट करण्यात आलेले आहे.


अशा प्रकारे आर्थिक प्रलोभन दाखवुन फसवणुक करणारे, नकली नोटा, नकली सोने दाखवुन फसवणुक करणारे 4 ते 5 गुन्हेगारांच्या टोळया निष्पन्न झाल्या असुन त्यांचे गुन्हेगार टोळीवर सुध्दा महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 (मोक्का) प्रमाणे कार्यवाही करण्याची कार्यवाही सुरु आहे.


सदर गुन्हयाचा तपास मा. श्री विश्व पानसरे पोलीस अधिक्षक बुलडाणा, मा श्री अशोक थोरात अपर पोलीस अधिक्षक खामगांव यांचे मार्गदर्शनात विनोद ठाकरे उप विभागीय पोलीस अधिकारी खामगांव करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم