मराठा भूषण पुरस्काराने संजय शिनगारे सन्मानित
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क - सामाजिक, राजकीय व आरोग्य क्षेत्रात सदैव नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष, संजय शिनगारे यांना मराठा सेवा मंडळ अकोला यांच्या वतीने काल रविवार २९ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय ' मराठा भुषण ' देऊन पुरस्कार सन्मानित करण्यात आले.
अकोला येथील मराठा मंगल कार्यालयात काल रविवार दि. २९ डिसेंबर रोजी ४३ वा मराठा समाज उपवर-वधू व पालक परिचय मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरलीधर सटाले अध्यक्ष मराठा सेवा मंडळ अकोला जिल्हा हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून न्यायमूर्ती योगेश कोईनकर, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार, प्रसिद्ध सर्जन डॉ. सुभाष भागडे, जेष्ठ साहित्यिक रामदादा मोहिते, प्रदीप लुगडे,गजानन थिटे,पंडित चौधरी,भगत काका, रमाकांत गलांडे,सखाराम काळदाते, गजाननराव माने आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते संजय शिनगारे यांना मानाचा मराठा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश इत्यादी राज्यातील समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन अकोला महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी अनिल बिडवे यांनी केले. संजय शिनगारे यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजाचा सत्कार सर्वात मोठा पुरस्कार - शिनगारे
मराठा भूषण पुरस्काराने सन्मानित संजय शिनगारे हे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजाने सत्कार करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. सध्या सरकारी नोकरीची कमी आहे, त्यामुळे समाजातील हुशार व मेहनती युवकांचा वधू पित्याने विचार करावा, समाजाला उन्नत बनवायचे असेल तर तडजोड करायला हवी असेही यावेळी त्यांनी सांगितले.
إرسال تعليق