४२ वर्षानंतर अ. खि. नॅशनल हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन

खामगाव - दि. २९ डिसेंबर रोजी श्री अरजण खिमजी नॅशनल हायस्कुल येथे १९८२ मध्ये बारावी वाणिज्य शाखेत ४२ वर्षा अगोदर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी एकत्र जमले. यावेळी उपस्थित सर्वांनी आपल्या शिक्षणाच्या काळातील घडलेल्या प्रसंगाबाबत अनेक आठवणी काढल्या. नंतर तेथुन फोर सिझन मध्ये स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी सिनेमातील गाणे म्हणून आपला आनंद साजरा केला तर अंताक्षरीसह, विविध प्रकारचे खेळाचे आयोजन करण्यात आले होते व भोजनाचा आस्वाद घेतला.

सदर स्नेहमिलन सोहळ्याला सौ. निता बोधे (अकोट), गीता मधुकर आमले (पुणे), माया दिनकर भिसे (खामगांव), सौ. मानसी मुळे (मलकापूर), सुरेंद्र जवरीलाल तातेड (खामगांव), महेंद्रसिंग एस. ठाकूर (बुलडाणा), अजय ग. तिडोळे (नागपूर), सुनिल पु. खंडेलवाल (खामगांव), राजेश भो. सोनोने (खामगांव), सुधीर वि. कुळकर्णी (खामगांव), अनिल गजानन रंगदळे (जळगांव खांदेश), सतिश वामनराव गावंडे (खामगांव), गजानन सुखदेव वानखडे (खामगांव), अनिल हरीभाऊ लांजुडकर (शेगांव), दिपक शिवलाल अग्रवाल (खामगांव), नरेंद्र रघुनाथ चव्हाण (खामगांव), अजय शशिकांत पिसोळकर (पुणे), अशोक द्वारकादास अग्रवाल (खामगांव), विजय भा. कुळकर्णी (खामगांव), राजकुमार गोयनका (खामगांव), कैलास वर्मा (यवतमाळ), मनोहर वर्मा (खामगांव) आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सुनिल खंडेलवाल तर आभार प्रदर्शन महेंद्रसिंग ठाकूर यांनी केले. वरील माहिती राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.



Post a Comment

أحدث أقدم