लॉयन्स क्लब संस्कृती तर्फे निशुल्क ब्लड प्रोफाईल तपासणी शिबीर

खामगाव - लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती तर्फे दि. ५ ते ७ डिसेंबर रोजी स्थानिक शासकीय रूग्णालयात क्लबचे सर्व सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत ब्लड प्रोफाईल तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात निशुल्क जवळपास २० ते २५ रक्त तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये टीएफटी, एचबीए१सी, एलएफटी, केएफटी व सीबीसी तपासणी सुध्दा करण्यात आल्या. या शिबीरात सुमारे ४५ लॉयन्स सदस्यांसह त्यांच्या संपुर्ण कुटुंबाची चाचणी घेण्यात आली. एमजेएफ लॉ. विरेंद्र शहा यांनी या शिबीराचे संपुर्ण नियोजन केले. वरील माहिती क्लबचे मार्केटींग कम्युनिकेशन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका यांनी दिली आहे


.

Post a Comment

أحدث أقدم