माणुसकीच्याही पुढे जाऊन आपुलकीने जगायचं असतं कोणाचं कोणी नसेल तरी आपण त्यांचं व्हायचं असतं!!
वीर हनुमान मंडळाचा असाही सेवा उपक्रम
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- निवडणूक निकाल ऐकण्यासाठी पटांगणात उभे असलेल्या मतदार बांधवांसाठी स्थानिक वीर हनुमान मंडळाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली .खामगाव मतदार संघातून कोण निवडून येते याची उत्सुकता होती. चुरशीच्या निवडणुकीत मतदानाचा निकाल ऐकण्यासाठी मतदारसंघातील सर्वपक्षीय नागरिकांनी जेवी मेहता नवयुग विद्यालयाच्या प्रांगणात मोठी गर्दी केली होती.
या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. अशावेळी शंकर नगर भागातील वीर हनुमान मंडळाने पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. त्यामुळे "माणुसकीच्याही पुढे जाऊन आपुलकीने जगायचं असतं कोणाचं कोणी नसेल तरी आपण त्यांचं व्हायचं असतं!!"याची प्रचिती आली. उपक्रमाला यशस्वी करण्याकरिता जसवंतसिंघ शिख पप्पू भैय्या, प्रमोद भाउ जैन व पदाधिकारी यांनी करुन भारतीय जनता पक्षाच्या विजया च्या सन्मानार्थ पक्षाच्या समर्थकांसह विरोधी पक्षातील लोकांना सुध्दा पानी पाजले त्यांचा या कार्य मुले त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातुन अभिनंदन केल्या जात आहे.
إرسال تعليق