जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आवार येथे "संविधान दिन" साजरा केला

जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आनंद गुंजकर ज्यू कॉलेज आवार येथे "संविधान दिवस " या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केले होते.सर्वप्रथम २६/११ च्या दिवशी पाकिस्थानच्या हल्यामध्ये कामास आलेल्या "शहिदांना श्रद्धांजली" वाहण्यात आली. 

       या वेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रा.डीएस.जाधव सर यांनी स्वीकारले तर संचालन कु.भावना देशमुख मॅडम यांनी केले. प्रास्ताविक भाषण सौ. वाघमारे  यांनी केले, या वेळेस "संविधान दिवस" यावर श्री.अल्हाट सर ,सौ.मोरे मॅडम यांनी प्रकाश टाकला तर श्री.जुमळे सर यांनी संविधानावर कविता सादर केली. विद्यार्थिनींमधून कु.प्रगती सुरवाडे व इतर ५ विद्यार्थिनींचा समायोजित भाषण दिली. 

शाळेतील सर्व मुलांकरिता संविधान उद्देशिकेचे वाचन सौ.ठाकरे मॅडम यांनी पार पाडले.शेवटी अध्यक्षीय भाषण प्रा.डी.एस.जाधव सर यांनी केले त्यामध्ये संविधानाचे महत्व भारतीय राज्यघटना ,भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्य नागरिकांचे न्याय,बंधुता,समानता ,स्वतंत्रता ,सर्वधर्मसमभाव व संविधानाबाबत जागृती या बाबतीत सविस्तर विवचंन केले. कार्यक्रमाचे आभार श्री. पाटील सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेकरिता श्री.ब्राम्हणे सर ,घोडके सर,बंड सर,यांनी केले तर सौ.शेलकर मॅडम, कबाडे मॅडम,भोपळे मॅडम, मोरे मॅडम,देवचे मॅडम ,पुंड मॅडम ,जैन मॅडम मारके मॅडम,कुणाल सर तर सहकारी वर्ग श्री. वांढे सर,श्री.तायडे भाऊ,श्री.इंगळे भाऊ ,सौ.तायडे काकू व बोचरे काकू यांनी सहकार्य दिले

Post a Comment

أحدث أقدم