राजू पाठक यांचे निधन
खामगाव:- टिळक राष्ट्रीय विद्यालय खामगाव परिवारातील सदस्य तथा निळकंठ नगरातील प्रतिष्ठित नागरिक गुरूदास (राजु) नारायण पाठक काल २१ नोव्हेंबर रोजी रात्री हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 60 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 1मुलगा ,2मुली असा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज २२ नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता निळकंठ नगर श्रीराम मंदिर समोर इथून निघणार आहे.जनोपचार परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
إرسال تعليق