८१ वर्षीय जोशी काकांनी बजावला मतदानाचा हक्क

 खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क- मतदानाचा हक्क बजाविणे हा केवळ आपला अधिकार नसून तो एक राष्ट्रीय कर्तव्य सुध्दा आहे. या कर्तव्य भावनेतून सराफा भागातील रहिवासी कचरूलाल रामनिवास जोशी यांनी लोकसभेनंतर,आता विधानसभेच्या निवडणुकीतही वयाच्या ८१ व्या वर्षी डायलिसिस ची स्थिती व अपंगत्वावर मात करीत बजावला मतदानाचा हक्क. स्थानिक सराफा भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते रवि जोशी यांचे वडील कचरूलाल जोशी हे मागील एक वर्षा पासून किडनी च्या दुर्धर आजाराने ग्रस्त असताना सुद्धा त्यांना मतदानाची ओढ लागली होती. 

........जाहिरात.....

त्यामुळे त्यांनी शारीरिक व्याधीने ग्रस्त असूनही आपल्या मतदान करण्याच्या इच्छाशक्ती, व कर्तव्य तत्परतेमुळे, आपल्या राहत्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत असा प्रवास करीत तेथे पोहचून परिवारासह मतदानाचा हक्क बजावून मतदान केले, मतदान करणे, हे आपले मौलिक अधिकार व मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे ही आज काळाची गरज आहे, या माध्यमातून त्यांनी आपली राष्ट्रभक्ती व कर्तव्यतत्परता याद्वारे समाजा समोर एक आदर्श निर्माण करून मतदान करणे हे किती महत्त्वाचे व मोलाचे कार्य आहे असा संदेश समाजाला दिला.*

Post a Comment

أحدث أقدم