आकाश फुंडकर यांच्या प्रचारार्थ उद्या खामगावात हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी व पंकजा मुंडे यांची जाहीर सभा

खामगाव- भाजप, शिवसेना, मित्रपक्ष महायुतीचे खामगाव विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार ऍड. आकाशदादा फुंडकर यांच्या प्रचारार्थ उद्या रविवार दि.17 नोव्हेंबर रोजी दु.12.30 वाजता स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर 

हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंहजी सैनी व भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

   महायुतीचे उमेदवार ऍड आमदार आकाशदादा फुंडकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून संपर्ण मतदार संघात त्याचा जोरदार प्रचार सुरू आहे. प्रचारात आ. फुंडकर यांना नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. गावो-गावी छोटेखानी होणाऱ्या प्रचारसभांना मोठी गर्दी होताना दिसत आहे. दरम्यान उद्या रविवार दि. 17 नोव्हेंबर रोजी आमदार ऍड. आकाशदादा फुंडकर यांच्या प्रचारासाठी खामगावातील  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंहजी सैनी व

भाजपच्या स्टार प्रचारक आमदार पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला महायुतीचे उमेदवार ऍड. आमदार आकाशदादा फुंडकर यांच्यासह भाजप, शिवसेना व मित्रपक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या सभेला महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم