खामगांव अर्बन बँक शेगांव शाखेचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न - ग्राहकांच्या विश्वासामुळेच खामगांव अर्बन बँकेची प्रगती - प्रा. विजय पुंडे अध्यक्ष
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- दि खमागांव अर्बन को-ऑप. मल्टीस्टेट शेड्युल्ड बैंक शेगांव शाखेचा ग्राहक मेळावा दि. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष प्रा. श्री. विजयजी पुंडे तर प्रमुख अतिथी सरव्यवस्थापक श्री. निलेशजी पुंडकर, केशव अर्बन पतसंस्था शेगांव हे होते. तसेच मंचावर नगर संघचालक श्यामजी तेल्हारकर, संचालक डॉ. मोहनजी बानोले, मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी) ज्ञानेश्वरजी जाधव हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्राहकांची उपस्थिती होती. भारतमाता पुजन व संत गजानन महाराजांचे प्रतिमेचे पुजन, दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी प्रमुख वक्ते निलेशजी पुंडकर यांनी मनोगत व्यक्त करतांना खामगांव अर्बन बँकेच्या लोकाभिमुख कार्याची प्रशंसा केली. सध्याच्या आर्थिक क्षेत्रातील घडामोडींबाबत सविस्तर विश्लेषन केले. तसेच येत्या २० तारखेला मतदानाचा हक्क बजावून सशक्त लोकशाही करीता व देशहिताकरीता चांगले प्रतिनिधी निवडण्यास हातभार लावावा असे आवाहन यावेळी केले. उपस्थित ग्राहक मनोहर अवचार, किर्ती सांघाणी, मनोहर पाचपोर यांनीही बँकेच्या ग्राहकसेवेबाबत समाधान व्यक्त करून बँकेच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. संचालक डॉ. मोहनजी बानोले यांनीही समयोचीत मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षणीय भाषणात बँकेचे अध्यक्ष प्रा. विजयजी पुंडे यांनी सांगितले की, खामगांव अर्बन बँकेने नेहमी ग्राहकांना केंद्रबिंदु मानून ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यामुळे ग्राहकांचा खामगांव अर्बन बँकेवर प्रचंड विश्वास आहे. ग्राहकांच्या विश्वासाचे बळावरच बँकेची नेत्रदिपक प्रगती झाली असून, ग्राहक मेळाव्याचे माध्यमातून ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधून सुचनांची सकारात्मक अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले व येत्या काळात मेहकर, जळगांव जामोद, नांदुरा इ. शहरात लवकरच शाखा स्थापन करुन शाखाविस्तार करण्यात येईल. आपल्या बँकेला नुकताच संपूर्ण महाराष्ट्र व संपूर्ण मध्य प्रदेश कार्यक्षेत्रात शाखा उघडण्यासाठी परवानगी मिळाली अशी माहिती उपस्थित सभासदांना दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी) ज्ञानेश्वरजी जाधव यांनी बँकेचा संपूर्ण आर्थिक लेखाजोखा सविस्तर सादर केला व भविष्यातील बँकेच्या योजनांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाखाधिकारी अजय माटे तर आभार प्रदर्शन काशिनाथ घनोकार यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता सहा. अधिकारी अभिषेक नेवे, संजय इंगळे, अनंता तिवडे, विजय राठोड, राजेंद्र जाधव, मनोज इंगळे, गजानन ढोरे यांचेसह इतर शाखांमधील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
إرسال تعليق