प्रा. रामकृष्ण गुंजकर बारा वर्षा पासून जपताहेत सामाजिक बांधिलकी ; दिवाळी निमित्त आदिवासी बांधवांना फराळ व कपडे भेट!

खामगाव -प्राधपक रामकृष्ण गुंजकर सर हे दरवर्षी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करत गेल्या  बारा वर्षा पासून  सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय संस्थेद्वारा तसेच गुंजकर एज्युकेशन खामगावच्या वतीने 2 नोव्हेंबर दिवाळीच्या दिवशी  सातपुडा पर्वत रांगेतील सालाईबन येथे दरवर्षीप्रमाणे  दिवाळीनिमित्त फराळ आणि कपडे वाटप करण्यात आले. या अनोख्या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर तथा संस्थेच्या सचिव प्रा. सो सुरेखा गुंजकर, तरुणाई फाउंडेशनचे मंजीतसिंग सिख संस्थेचे कर्मचारी दामू मिसाळ यांची उपस्थिती होती. स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बौद्धिशीय संस्थेद्वारा दरवर्षी दिवाळीनिमित्त फराळाचे आणि कपड्याचे वाटप करण्यात येत असते दहा ते बारा वर्षापासून सतत हा उपक्रम संस्थेद्वारा राबविण्यात येत आहे. संस्थेने पुढील शैक्षणिक वर्षासाठी त्या आदिवासी भागातील मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी किंवा त्यांचे शिक्षण नर्सरी ते पीजीपर्यंत करण्यासाठी संस्थेचा मानस आहे असे या निमित्ताने प्रा. रामकृष्ण गुंजकर यांनी सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم