भरधाव ट्रॅक्टर घुसले देवीच्या मंडपात : काही काळ तणाव: रोहित पगारिया यांच्यामुळे पुढील घटना टळली
खामगाव : चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव ट्रॅक्टर देवीच्या मंडपात शिरल्याची घटना सोमवार, दि.२१ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घाटपुरीतील खुपसे नगरात घडली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शिवाजी नगर पोलिस स्टेशनतंर्गत येत असलेल्या घाटपुरीतील खुपसे नगरातून जात असलेला भरधाव ट्रॅक्टर रात्री थेट देवीच्या मंडपात घुसला. त्यामुळे मंडपाच्या एका भागाची नासधूस झाली. देवीच्या आरतीनंतर महिला आणि भाविक तेथे जमलेले असतानाच हा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घडलेला घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
إرسال تعليق