महाराष्ट्र ब्राह्मण सभेमध्ये शारदा माता उत्सवाची सांगता

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- महाराष्ट्र ब्राह्मण सभा व मातृ शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण सभे मध्ये नुकताच तीन दिवसीय शारदा माता उत्सव पार पडला त्यावेळी सौ कावडकर मॅडम  यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महिलांनी खुप उत्साहाने सहभाग घेतला .हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा खुप छान झाला. सर्व भगिनींनी खिरापत व चटपटीत डाळी चा आस्वाद घेतला महिला अध्यक्षा सौ. जान्हवी ताई कुळकर्णी, उपाध्यक्षा सैौ शितल ताई जोशी व सौ शोभा ताई कुळकर्णी यांच्या   हस्ते बक्षिस सभारंभ सोहळा । पार पडला व मग शारदा मातेचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यांत आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महिला कार्यकारणिचे मोलाचे सहकार्य लाभले 



Post a Comment

أحدث أقدم