दिवाळी व भाऊबीज सणाकरीता बाहेगांवी जातांना खालील काळजी घेवु.. "आपल्या संपत्तीच्या संरक्षणाकरीता आपण सुज्ञ नागरिक म्हणुन आपले कर्तव्य पार पाडु या...."
आपण बाहेरगावी जातांना आपल्या शेजाऱ्यांना घराकडे लक्ष्य ठेवण्याची विनंती करावी.
मौल्यवान दागिने हे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत, घरात ठेवुन गावाकडे जावु नये.
रोख रक्कम जास्त प्रमाणात जवळ बाळगु नये, ए टी एम, गुगल पे व फोन पे अॅपचा वापर करावा.
बाहेर गावी जातांना आपले घराच्या समोरील व पाठीमागील बाजुस लाईट लावुन ठेवावेत. तसेच घराचे दरवाज्याचे बाहेर पडदा लावुन दरवाज्याला कुलुप लावावे, जेणे करुन कुलूप दिसणार नाही.
आपल्या गावात अथवा गल्लीमध्ये कोणी अनोळखी इसम दिसुन आल्यास त्याचेवर पाळत ठेवुन त्वरीत पोलीसांना माहिती दयावी,
आपले मोबाईलव्दारा सणानिमीत्त सवलत मिळत आहे. अशी खोटी बतावणी करणाऱ्या अशा
कोणत्याही व्यक्तीला OTP, CCV क्रमांक सांगु नये, किंवा कोणत्याही लिंक वर क्लीक करु नये.
ATM कार्ड वापरतांना कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडे आपले ATM कार्ड देवु नये.
आपले दुकान अथवा राहते घर येथे CCTV कॅमेरा बसविण्यात यावे.
दागिने पॉलीश करुन देतो असे सांगणाऱ्यावर विश्वास ठेवु नये असे आढळल्यास त्वरीत पोलीसांशी संपर्क साधावा.
आम्ही पोलीस आहोत आम्हाला तुमची झडती घ्यायची आहे तुमचे दागिने काढुन रुमाला मध्ये ठेवा असे सांगणा-या तोतया पोलीसापासुन सावध रहा.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नका.
अडचणीच्या वेळेस त्वरीत पोलीसांशी संपर्क साधा तसेच 112 वर कॉल करा अथवा खालील क्रमांकाची संपर्क करा
पो.नि आर एन. पवार मो.क्र 7030530492
सपोनि भागवत मुळीक मो.क्र 7988355793
सपोनि संदीप गोंडाणे मो.क्र.9923608947
पोउपनि निलेश लबडे मो.क्र.9767108510
पोउपनि विनोद खांबलकर मो.क्र.9763057910
मपोउपनि रिना सदार मो.क्र. 8888523189
प्र. पोउपनि अमोल पाटे मो.क्र. 9765162009
إرسال تعليق