विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या १० वर्षाच्या संघर्षाला अखेर यश ! बुलढाणा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त गावांमध्ये जल्लोष..
खामगाव अनिल मुंडे...
विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी गेल्या १० वर्षांपासून मनोज भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचा संघर्षाचा लढा सुरू होता.त्याला अखेर यश आले आहे.नुकतेच दिनांक २६/०९/२०२४ रोजी सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे नियामक मंडळाची बैठक पार पडली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत विदर्भातील सरळ खरेदी धारक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच लक्ष रुपये सानुग्रह अनुदानास मंजूरी देण्यात आली १६,६३३ हेक्टर जमीनीसाठी ८३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत ६ जून २००६ च्या जि.आर.नुसार सरळ खरेदी पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून घेतल्या होत्या सदर शेतकऱ्यांचे न्यायालयात जाण्याचे संवैधानीक अधिकार सुध्दा हीरावुन घेतले होते १८९४ च्या भूसंपादन कायद्यानुसार जमीनी संपादित केल्या असत्या तर शेतकऱ्यांना न्यायालयात जाता आले असते.त्यामुळे संघर्षा शिवाय शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय कोणताच उरला नव्हता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांच्या प्रखर नेतृत्वात गेल्या दहा वर्षांपासून विदर्भात ऐतिहासिक आंदोलने करण्यात आली.अखेर प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला. दरम्यान अमरावती विभागातील काही मोजक्या आमदारांनी प्रकल्पग्रस्तांचे मुद्दे सभागृहात मांडलेत परंतु पोटतिडकीने मांडले नसल्याचे मनोज चव्हाण यांनी काळे गाव येथे सत्कार समारंभात बोलतांना सांगितले. आमदार प्रताप दादा अडसड यांनी आपलं कर्तव्य पार पाडत प्रकल्पग्रस्तांच्या वतीने सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. प्रकल्पग्रस्तांसाठी तुटपुंजा का होईना असा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याची मिस्किलपणे चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. जिल्ह्यातील विविध प्रकल्पग्रस्त गावातील हजारो प्रकल्पग्रस्तांनी जल्लोष साजरा करत मनोजभाऊ चव्हाण यांचा मोठ्या थाटात सत्कार करण्यात आला ज्ञानगंगा प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या काळे गाव येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.जळगाव जामोद, नांदुरा, खामगाव या तालुक्यातील गावांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.काळेगाव येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष अनिल मुंढे, संघटनेचे सहसचिव भुषण चौधरी, दिलिप कदम, राजु देठे, सरपंच विलास पाटील,जिल्हा उपाध्यक्ष भास्कर वानखेडे,भागवत गायगोळ गणेश इंगळे, वैभव भारसाखळे, विरेंद्र इंगळे, विनोद बगाडे, एकनाथ बोर्डे,सागर इंगळे,नंदु इंगळे, विठ्ठल बोचरे, गजानन बोचरे, विनोद खंडारे, तायडे सर, मुन्ना बोचरे, अमोल इंगळे,प्रकाश भारसाखळे, अरुण पाटील, प्रशांत अमलकार, निलेश इंगळे, महादेव अमलकार, राजेंद्र भारसाखळे, प्रमुखाने उपस्थित होते. तर परिसरातील निमकवडा, काळेगाव,दिवठाणा, वर्णा,रोहणा, चोंडी,काकोडा, टाकळी जिगाव सह इत्यादी गावातील प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
إرسال تعليق