किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-दिवाळीच्या सुट्टीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी तसेच मुलांच्या हस्तकलागुणांना चालना देण्यासाठी,व गडकिल्ल्यांची माहिती व्हावी,सांघिक वृत्ती वाढावी यासाठी मैत्र बहुउद्देशीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था खामगावच्या वतीने "किल्ले बनवा" स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यातील पाच ते पंधरा वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात.गड किल्ला बनवण्यासाठी किमान पाच व जास्तीत जास्त आठ मुला मुलींचा गट असावा.
![]() |
तयार केलेल्या गडकिल्ल्यांचा फोटो अथवा व्हिडिओ दीपक महाकाळे सर मो.9518579418 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करावा. |
तसेच किल्ला बनवण्यासाठी माती, दगड, वीट, शेणखत,कागद,नैसर्गिक रंग,आणि इतर वस्तूचा वापर करता येईल. किल्ल्याची भव्यता दर्शविण्यासाठी खेळण्यातील अथवा टाकाऊ वस्तूपासून बनवलेली तोफ, तलवारी,भाले,हत्ती,घोडे,मावळे झेंडे उपयोगात आणावे.आणि शिवरायांचा फोटो अथवा मूर्ती गड किल्ल्यावर स्थानापन्न करावी. तयार केलेल्या गडकिल्ल्यांचा फोटो अथवा व्हिडिओ दीपक महाकाळे सर मो.9518579418 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करावा.
निवडलेल्या पात्र गडकिल्ल्यांचे परीक्षण हे परीक्षकांमार्फत जागेवर जाऊन केल्या जाईल. स्पर्धेविषयी कुठलीही माहिती जाणून घेण्यासाठी स्पर्धकांनी मोबाईल क्रमांक 9518579418 यावर संपर्क साधावा.
तरी स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन मैत्र बहुउद्देशीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था खामगावच्या वतीने अध्यक्ष दीपक महाकाळे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे..
आपला नम्र
दीपक महाकाळे,
खामगाव
9518579418
إرسال تعليق