खामगावात मनसेचे शिवशंकर लगर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

खामगाव- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी एकला चलोरे ची भूमिका घेत स्वबळावर निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली आणि राज्यातील आपल्या शिलेदारांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानुसार खामगाव विधानसभा मतदार संघातील कुणबी समाजाचे उदयोन्मुख नेतृत्व शिवाभाऊ उर्फ शिवशंकर पुरुषोत्तम लगर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तर राज साहेब यांच्या आशीर्वादाने  आज 28 ऑक्टोबर रोजी त्यांनी आपल्या शेकडो मनसे कार्यकर्तासह व महिला बहिणीसह उमेदवारी अर्ज दाखल केला. सदर रॅलीची सुरूवात शेगाव रोडवरील हंसराज नगरातून सुरूवात करण्यात आली. रॅली दरम्यान सामान्य रूग्णालयातील कांतिसुर्य महात्मा फुले पुतळा, लोकमान्य टिळक पुतळा,  छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदि महापुरूषांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. ही रॅली  शेगाव रोड येथून सुरुवात होऊन टिळक पुतळा, अर्जुन जल मंदिर, मेन रोड,जगदंबा चौक, फरशी, भगतसिंग चौक, एकबोटे चौक,अग्रसेन चौक मार्गे येथे पोहोचताच गांधी उद्यान येथे समारोप करण्यात आला. यानंतर शिवशंकर लगर यांनी उपविभागीय कार्यालय येथे अर्ज दाखल केला. यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष अमित देशमुख, मनसेचे मदनराजे गायकवाड,  खामगाव शहराध्यक्ष आनंद गायगोळ, शहर उपाध्यक्ष  आकाश पाटील, जिल्हा संघटक शैलेश गोंधणे, विनोद टिकार, शिवशरण खोंड पाटील, भागवत उगले सागर जगदाळे सागर भोपळे आकाश वानखेडे करण दीक्षित लखन खुपसे आकाश परकाळे आकाश खुपसे राजेश ठाकरे महादेव महाले ज्ञानेश्वर कांडेलकर अभिजित मानकर यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم